पठाणकोटमध्ये लष्कराच्या वर्दीतील चार संशयित पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 02:06 PM2018-11-30T14:06:37+5:302018-11-30T14:07:18+5:30
पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशची नंबरप्लेट असलेल्या स्कॉर्पियो गाडीमधून ताब्यात घेण्यात आलेले संशयित प्रवास करत होते.
पठाणकोट : पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशची नंबरप्लेट असलेल्या स्कॉर्पियो गाडीमधून ताब्यात घेण्यात आलेले संशयित प्रवास करत होते.
पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान पोलीस तपास करताना या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सध्या पंजाब पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे, या चौघेही लष्कराच्या वर्दी असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी पंजाबमार्गे भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. तसेच, अमृतसरमधील एका गावात ग्रेनेड हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. याआधीही 14 नोव्हेंबर रोजी चार संशयितांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, जानेवारी 2017 मध्ये पठाणकोटच्या लष्कराच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सात जवान शहीद झाले होते.