भरडधान्यातून खाद्य सुरक्षेचा मार्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 08:49 AM2023-03-19T08:49:19+5:302023-03-19T08:49:36+5:30

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

Pathway to food security through bulk food - Prime Minister Narendra Modi | भरडधान्यातून खाद्य सुरक्षेचा मार्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भरडधान्यातून खाद्य सुरक्षेचा मार्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

googlenewsNext

नवी दिल्ली : खाद्य सुरक्षा आणि खानपानविषयक सवयींच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘भरडधान्ये’ उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशाच्या खाद्य टोपलीत या धान्यांची हिस्सेदारी वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञांना केले.

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताचे प्रयत्न आणि प्रस्तावामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भरडधान्यास जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत  सातत्याने प्रयत्न करत आहे. भरड धान्ये ही प्रतिकूल हवामानात तसेच रसायने व खते यांच्या वापराविना सहजपणे उत्पादित केली जाऊ शकतात. 

भरडधान्याचे प्रमाण ५ टक्के
भारताच्या राष्ट्रीय खाद्य टोपलीत भरडधान्यांची हिस्सेदारी आज केवळ ५ ते ६ टक्के आहे. ही हिस्सेदारी वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मी भारताचे शास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञांना करतो. त्यासाठी साध्य करण्याजोगी उद्दिष्ट्ये आपल्याला निर्धारित करावी लागतील, असे मोदी म्हणाले.

शेतकरी हाेत आहे सक्षम
भरडधान्याद्वारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेत आहे. देशात सुमारे २.५ काेटी शेतकरी प्रत्यक्षपणे भरडधान्याशी जुळलेले आहेत. त्यांना भरडधान्य मिशनचा लाभ होईल. यातून त्यांचे उत्पन्न वाढत असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत हाेईल, असे माेदी म्हणाले.

भरडधान्याचे सेवन वाढले
देशात १२-१३ राज्यांमध्ये भरडधान्याचे उत्पादन हाेते. मात्र, त्यांचा वापर फार कमी हाेता. एक व्यक्ती महिनाभरात २ ते ३ किलाे भरडधान्य खायचा. आता हे प्रमाण दरमहा १४ किलाेवर गेले आहे.

टपाल तिकिटाचे अनावरण 
- राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या संकुलात ‘जागतिक श्री 
अन्न परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काढण्यात आलेले ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३’ या विषयीचे टपाल तिकीट व नाण्यांचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 
- या परिषदेला १०० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. १९ मार्च रोजी परिषदेचा समारोप होणार आहे. भारत यंदाच्या जी-२० देशांच्या परिषदेचा यजमान आहे. त्याचे औचित्य साधून भारत सरकारने 
भरडधान्यांचा विषय जी-२० परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरही घेतला आहे.

Web Title: Pathway to food security through bulk food - Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.