पतियाळा कोर्टाबाहेर वकिलांचा आजही धुडगूस, कन्हैय्याला 2 मार्चपर्यंत कोठडी
By admin | Published: February 17, 2016 02:10 PM2016-02-17T14:10:26+5:302016-02-17T17:12:39+5:30
कन्हय्याला न्यायालयात नेले जात असताना मारहाण करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने म्हटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - जवाहरलाल नेहरू विदयापीठातील वातावरण आजही चिघळलेले असून वकिलांनी कन्हय्या कुमारला धक्काबुक्की केली तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीलाही शिवीगाळ केली. पतियाळा कोर्टाबाहेर घडलेला गंभीर प्रकार बघून न्यायालयाने कपिल सिब्बल, दुष्यंत दवे, हरीन रावल, राजीव धवन, एजीएन राव आणि अजित सिन्हा यांची समिती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेमली. ही समिती ज्यावेळी कोर्टात आली, त्यावेळी हुल्लडबाजी करणा-या वकिलांनी त्यांनाही शिवीगाळ केली आहे. समितीच्या सदस्यांनी दगडही फेकण्यात आल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, न्यायालयाने कन्हय्या कुमारला 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कन्हैय्या कुमारला सुनावणीसाठी न्यायालयात आणले जात असताना वकिलांनी कन्हैय्या कुमारला मारहाण केली आहे. मात्र, दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी फारशी मारहाण झाली नसल्याचा व त्याची वैद्यकीय तपासमी करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
त्याअगोदर आज सकाळी न्यायालयाबाहेर वकिलांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती, यादरम्यान फर्स्ट पोस्टचे पत्रकार तारिक अन्वर यांनादेखील मारहाण करण्यात आली. सोमवारी पत्रकारांवर हल्ला करणारे वकिल म्हणाले की, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणा-यांना हिरो ठरवले जाते आणि आम्हाला गुंड म्हणतात असे घोषणाबाजी करणा-या वकिलाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने पतियाला हाऊस कोर्टात कन्हैयाच्या खटल्याच्या सुनावणीला कन्हैयाच वकिल, कुटुंबिय मित्र यांच्या व्यतिरिक्त वकिलांसह इतरांना हजर राहण्यास मनाई केली होती.
या प्रकरणातील महत्त्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे:
- भाजपा आमदार ओ. पी. शर्मा यांना दिल्ली पोलीसांनी समन्स बजावले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पतियाला कोर्टातील परिस्थितीचा अहवाल सादर केला आहे.
- कन्हय्याला न्यायालयात नेले जात असताना मारहाण केल्याची माहिती अहवालात आहे.
- पोलीस सुरक्षेची हमी देऊ शकत नसतील तर आम्हाला तसा आदेश द्यावा लागेल, सुप्रीम कोर्टाची तंबी
- आम्हाला पाकिस्तानचे गुलाम संबोधत काही वकिलांनी आम्हाला अश्लील शिवीगाळ केल्याचे राजीव धवन यांनी सांगितले.
- कन्हय्याला सुरक्षा पुरवण्यास पोलीस अपयशी ठरल्याचा समितीचा निष्कर्ष
- मी देशद्रोही नाही, शांतताप्रिय असून भारताची राज्यघटना मानणारा असल्याचे कन्हय्याचे प्रतिपादन
- JNU मधल्या पोलीस कारवाईसंदर्भात मानवाधिकार आयोगाने, मुख्य सचिव, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि विद्यापीठाला नोटीस बजावली आहे.
- वकिल हे कोर्टाचे अधिकारी आहेत, त्यांच्याविरोधात बळाचा वापर करणं उचित झालं नसतं, त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली असती, पोलीस आयुक्त बस्सी यांचं स्पष्टीकरण.
- दिल्लीची कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं सांगत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चर्चेसाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे मागितली भेटीसाठी वेळ.
- पत्रकारांना केलेल्या मारहाणीसंदर्भात तीन वकिलांविरोधात समन्स बजावण्यात आलं आहे.
More security forces have been deployed at Patiala House Court premises. pic.twitter.com/ZzW99MkgFu
— ANI (@ANI_news) February 17, 2016
We came here to fight for Kanhaiya. Everything was calm but some lawyers started a scuffle: Lawyer outside PHCourt pic.twitter.com/I9zHGdb1Kw
— ANI (@ANI_news) February 17, 2016