Patiala Violence: पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:51 IST2022-04-29T14:50:41+5:302022-04-29T14:51:13+5:30

Patiala Violence: पंजाबच्या पटियालामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी खलिस्तानविरोधात मोर्चा काढला होता. यादरम्यान काही शीख संघटनांनी त्यांच्यावर दगडफेक केली.

Patiala Violence: Violent clashes between two communities in Patiala, Khalistan Zindabad chanting in front of police | Patiala Violence: पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

Patiala Violence: पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

Patiala Violence:पंजाबमधीलपटियाला येथे शुक्रवारी शिवसेना कार्यकर्ते आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हिंसेदरम्यान दगडफेक करण्यासोबत तलवारीदेखील दाखवण्यात आल्या. या घटनेत पोलिसांसह काहीजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सध्या संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.

पाहा Video:-

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना(बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना) कार्यकर्त्यांनी पटियाला येथे खलिस्तानविरोधात मोर्चा काढला होता. यादरम्यान, अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेकही करण्यात आली. प्रकरण शांत करण्यासाठी पोलिसांना मोठी फौज बोलवावी लागली. पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना पांगवले आणि अनेकांना ताब्यातही घेतले. 

पटियालामध्ये, शिवसेनेचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांच्या देखरेखीखाली आर्य समाज चौकातून 'खलिस्तान मुर्दाबाद' मोर्चाला सुरुवात झाली. शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. यावेळी काही शीख संघटनाही तलवारी घेऊन रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी हरीश सिंगला म्हणाले की, ''शिवसेना पंजाबचा कधीही खलिस्तान होऊ देणार नाही आणि खलिस्तानचे नाव घेऊ देणार नाही.'' 

शीख फॉर जस्टिसची घोषणा
29 एप्रिल रोजी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने पंजाबमधील सर्व सरकारी इमारतींवर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर ध्वजारोहण करून व्हिडिओ पाठवणाऱ्यांना एक लाख डॉलर्सचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. गुरपतवंत पन्नूला भारतात येण्यास सरकारने बंदी घातलेली आहे. गुरपतवंत सिंग पन्नू हा शिख फॉर जस्टिसचा प्रमुख आहे.

शीख फॉर जस्टिस म्हणजे काय?
शीख फॉर जस्टिस ही खलिस्तानी संघटना आहे, तिचे मुख्यालय अमेरिकेत आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने या संस्थेला बेकायदेशीर घोषित केले होते. गुरपतवंत सिंग पन्नू अनेकदा भारतात, विशेषतः पंजाबमध्ये लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतो. राजकारण्यांना धमकावण्यासोबतच अनेक प्रक्षोभक घोषणांमुळे पन्नू वादात सापडला आहे. पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान त्याने प्रक्षोभक आणि देशविरोधी वक्तव्ये केली आहेत.

Web Title: Patiala Violence: Violent clashes between two communities in Patiala, Khalistan Zindabad chanting in front of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.