16000 लोकांना ताब्यात घेतले, त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा - हार्दिक पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:09 PM2018-08-25T13:09:00+5:302018-08-25T13:10:08+5:30
पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या घरातच आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर टीका केली.
अहमदाबाद : पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या घरातच आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर टीका केली.
घरी येणारा लोकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. जवळपास 16 हजार लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. चारपेक्षा जास्त लोकांना पोलीस घरी येऊ देत नाहीत. येणाऱ्या लोकांकडे ओळखपत्र मागत आहेत, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले. याचबरोबर, त्यांच्या घरातील पाणी पुरवठा सुद्धा खंडित केला असल्याचे त्यांनी सांगितले. हार्दिक पटेल यांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे तीन पाटीदार नेते त्यांच्या घरी पोहचले आहेत. यामध्ये ललित लथगरा, ललित वसोया आणि किरीट पटेल यांच्या समावेश आहे.
येथील स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून अहमदाबादमध्ये उपोषण करण्यास हार्दिक पटेल यांनी परवानगी दिली नाही आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांनी आपल्या घरीच बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हार्दिक पटेल यांच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्याच्या घराजवळून जाण्या-या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.
गुजरात में आरक्षण और किसानों की क़र्ज़ा माफ़ी की माँग के साथ 25 अगस्त से अहमदाबाद में अनिच्छितकालिन अनशन ।।
— Hardik Patel (@HardikPatel_) July 24, 2018
हमारा विजय संकल्प है और सरकार को जनता के मौलिक अधिकारों के सामने झुकाएँगे !!! युवाओं को मिले अधिकार,
किसानों को मिले सम्मान ।। pic.twitter.com/SW52RRC3P8