जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल : राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:57 AM2018-04-20T00:57:51+5:302018-04-20T00:57:51+5:30

जम्मू आणि काश्मीरवर अनेक चढ-उतार व गोंधळाचा परिणाम झाला.

The patience of the people of Jammu and Kashmir is inevitable: the President | जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल : राष्ट्रपती

जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल : राष्ट्रपती

Next

जम्मू : अनेक कारणांनी निर्माण झालेल्या आव्हानांना जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी धाडस, अविचल धैर्य आणि लवचीकपणे तोंड दिले, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रशंसा केली. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी कोविंद यांच्या नागरी सत्कारासाठी येथील अमर महाल पॅलेसमध्ये बुधवारी रात्री आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.
कोविंद म्हणाले, जम्मू आणि काश्मीरवर अनेक चढ-उतार व गोंधळाचा परिणाम झाला. परंतु, आर्थिक व शैक्षणिक संधींचा उपयोग करून घेण्याच्या या राज्यातील लोकांच्या क्षमतेचा भारतीय लोकांना अभिमान आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The patience of the people of Jammu and Kashmir is inevitable: the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.