धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:33 PM2023-07-20T16:33:44+5:302023-07-20T16:34:34+5:30

यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती. 

patient reached Bageshwar Dham to be healthy life died in front of Dhirendra Shastri | धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं?

धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

बागेश्वर धाममध्ये आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा तरून गोरखपूरचा रहिवासी असून गुजरातमध्ये कुटुंबासह राहत होता. त्याचा फर्निचरचा व्यवसाय होता. तो काही दिवसांपूर्वी पत्नी, साली आणि मुलासह बागेश्वर धामला आला होते. तेथे त्याला चक्कर आली आणि तो बाबांसमोरच पडला. यानंतर, नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाचे नाव विजय कश्यप असे आहे.

यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती. 

अचानक चक्कर आली आणि खाली कोसळला - 
मृत विजयची साली आणि स्वत:चा सेवेकरी सांगणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, विजयला अचानक चक्कर आली आणि तो पडला. त्याला बागेश्वर महाराज पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडे नेण्यात आले. काही वेळ त्याचा श्वास सुरू होता. विजयला धीरेंद्र महाराजांचा अंगारा दिला आणि काही वेळ त्याची सेवा केली. मात्र काही वेळानंतर त्याचे श्वास घेणे बंद झाले. 

यानंतर त्याला बागेश्वर धामच्या अॅम्ब्युलन्सने जिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंर, त्याचे कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन गुजरातला रवाना झाले.  
 

Web Title: patient reached Bageshwar Dham to be healthy life died in front of Dhirendra Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.