आता ‘एम्स’ची ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळणार; डॉक्टर स्वत: फोन करून विचारणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:10 AM2020-04-19T02:10:20+5:302020-04-19T02:10:44+5:30
कोरोनामुळे एम्समध्ये एक महिन्यापासून रुग्णांसाठी आरोग्य सुविधा बंद करण्यात आली आहे.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : एम्सने सोमवारपासून रुग्णांसाठी आॅनलाईन अपॉइंटमेंटची सुविधा सुरू केली आहे. कोरोनामुळे एम्समध्ये एक महिन्यापासून रुग्णांसाठी आरोग्य सुविधा बंद करण्यात आली आहे.
केवळ इमर्जन्सी सेवाच सुरू आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कोरोनाच्या काळात अन्य रुग्णांनाही उपचार मिळत आहे. एम्स सोमवारपासून टेलिमेडिसिन सेवा सुरू करणार आहे. यामध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टर स्वत: फोन करून त्याला विचारणा करतील.
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आॅनलाईन अपॉइंटमेंट देताना रुग्णाने आपला मोबाईल नंबर अथवा फोन नंबर द्यावा.
एंडोक्रोनोलॉजी, डायलिसिस, बालरोग, कॅन्सर, कार्डिओलॉजी आणि आय सेंटरमध्ये रोग्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एम्सचे अधिकारी या रुग्णांबाबत काळजीत आहेत. त्यामुळे सोमवारपासून आॅनलाईन अपॉइंटमेंंट देण्यात येणार आहे.