Oxygen Shortage: देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला; संसदेत केंद्र सरकारची पहिल्यांदाच स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:38 AM2021-08-11T11:38:44+5:302021-08-11T11:41:23+5:30

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता.

Patients died due to oxygen shortage; central government has made a clear confession in Parliament | Oxygen Shortage: देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला; संसदेत केंद्र सरकारची पहिल्यांदाच स्पष्ट कबुली

Oxygen Shortage: देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला; संसदेत केंद्र सरकारची पहिल्यांदाच स्पष्ट कबुली

Next
ठळक मुद्देदेशभरात कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेला नाही असं यापूर्वी केंद्रानं म्हटलं होतं.केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला घेरलं होतंकेंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरामुळे विरोधकांनी गोंधळ केला होता. विरोधकांनी केंद्राच्या या उत्तरावरून निशाणा साधला होता.

नवी दिल्ली – आंध प्रदेशात ऑक्सिजन(Oxygen) च्या अभावामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. काही रुग्ण व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते. दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय(Health Ministry) ने मंगळवारी संसदेत दिली. केंद्र सरकारद्वारे पहिल्यांदाच याची कबुली देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना जीव गमवावा लागला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्राल्याने सांगितले की, ९ ऑगस्ट २०२१ रोजी आंध्र प्रदेश सरकारद्वारे केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे. जी संसदेद्वारे सभागृहात मांडण्यात येत आहे. १० मे २०२१ रोजी SVRR हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या तपासणीत समोर आलं की, ऑक्सिजन टँक आणि बॅकअप सिस्टममध्ये झालेल्या बदलामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात प्रेशर कमी झाला. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यात अडचण आली.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संसदेत म्हटलं होतं की, राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेला नाही. परंतु राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं होतं हे मान्य केले होते. मात्र कुठल्याही रुग्णाच्या मृत्यूसाठी हे कारण नव्हतं. केंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरामुळे विरोधकांनी गोंधळ केला होता. विरोधकांनी केंद्राच्या या उत्तरावरून निशाणा साधला होता. तर राज्य सरकारने जी माहिती दिली तीच केंद्र सरकारनं संसदेत सादर केली असा दावा भाजपाकडून करण्यात येत होता.

केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली होती. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उचलले होते. मोदी सरकारने राज्य सरकारांकडून खरे आकडे मागितले. राज्य सरकारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) ऑक्सिजन न मिळाल्याने किती रुग्णांचा मृत्यू झाला याची आकडेवारी मागितल्याचे सूत्रांनी सांगितलं होतं. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या मृत्यूंची आकडेवीरी पावसाळी अधिवेशनातच मांडली जाऊ शकते असं म्हटलं जात होतं, अखेर ही आकडेवारी संसदेत मांडली गेली.

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता. यावर आरोग्य मंत्रालयाकडून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत १०,२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आहे. सर्वाधिक १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना पुरविण्यात आला, तर दिल्लीला ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला अशीही माहिती केंद्रानं संसदेत दिली होती.

Read in English

Web Title: Patients died due to oxygen shortage; central government has made a clear confession in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.