अनुशेषामुळे रुग्णांची उपचारासाठी शहराकडे धाव

By admin | Published: December 27, 2014 11:38 PM2014-12-27T23:38:34+5:302014-12-27T23:38:34+5:30

११ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज : प्रस्ताव अधांतरी

Patients run for the treatment of patients due to the post-retention | अनुशेषामुळे रुग्णांची उपचारासाठी शहराकडे धाव

अनुशेषामुळे रुग्णांची उपचारासाठी शहराकडे धाव

Next
प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज : प्रस्ताव अधांतरी
गणेश हूड, नागपूर : २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर जिल्ह्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५७ उपकेंद्रांचा अनुशेष आहे. स्थानिक स्तरावर आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.
लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यात ६४ प्राथमिक अरोग्य केंद्र व ३६६ उपकेंद्र असायला हवीत. परंतु ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३२४ उपकेंद्र कार्यरत असून, ६ आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा प्रस्ताव अधांतरी आहे.
२० हजार लोकसंख्येमागे प्राथमिक आरोग्य केंद्र तर ५ हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावात उपकेंद्र असायला हवे. परंतु ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असूनही ११ ठिकाणी केंद्र सुरू झालेले नाही. यात दवलामेटी, वाडी, डोंगरगाव, माहुरझरी, खरबी, हुडकेश्वर, गोधनी, रनाळा, नीलडोह, वानाडोंगरी, डिगडोह आदींचा समावेश आहे. तसेच लोकसंख्येचा निकष पूर्ण केल्यानंतरही ५७ उपकेंद्रांना मंजुरी मिळालेली नाही. मात्र काटोल, नरखेड, पारशिवनी, उमरेड, कुही, भिवापूर, मौदा, कळमेश्वर या तालुक्यात अनुशेष नाही.
मागील काही वर्षांत नागपूर शहरालगतच्या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु त्यातुलनेत आरोग्य सुविधा उपलब्ध झालेली नाही. नागपूर, कामठी व हिंगणा तालुक्यातील अनुशेष भरून काढण्यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना निवेदन दिले.
चौकट...
मिहानमधील इमारत पडून
मिहान परिसरात १० हजारांहून अधिक स्थलांतरित वास्तव्यास आहेत. भविष्यात या भागातील लोकसंख्या ३० हजाराहून अधिक होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले. परंतु कर्मचारी व डॉक्टर नसल्याने इमारत पडून आहे. दोन डॉक्टरांसह १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास यावर वर्षाला ३७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
चौकट...
अनुशेष असलेले तालुके
तालुका आवश्यक केंद्र मंजूर केंद्र अनुशेष
नागपूर १० ३ ७
कामठी ४ ३ १
हिंगणा ७ ४ ३

Web Title: Patients run for the treatment of patients due to the post-retention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.