कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांत ‘टीबी’ संसर्ग वाढला; मध्यप्रदेशात, हैदराबादमध्ये आढळले रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 09:50 AM2021-07-16T09:50:45+5:302021-07-16T09:50:56+5:30
प्रशासनाची चिंता वाढली
भाेपाळ : काेराेना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना काही कालावधीपर्यंत त्रास किंवा इतर दुष्परिणामांना सामाेरे जावे लागत आहे. मात्र, आता एक गंभीर दुष्परिणाम लक्षात आला आहे. मध्यप्रदेशात काेराेनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना ‘टीबी’ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मध्यप्रदेशात ‘टीबी’चे रुग्ण वाढल्याचे आढळले आहे. त्यात बहुतांश रुग्णांना यापूर्वी काेराेना विषाणूचा संसर्ग झाला हाेता. ‘काेविड-१९’ हा एक विषाणूमुळे हाेणारा आजार आहे, तर ‘टीबी’ हा जंतुसंसर्गामुळे हाेताे. दाेन्ही आजारांमध्ये रुग्णांची फुप्फुसे आणि श्वसनयंत्रणेवर परिणाम हाेताे.
भाेपाळच्या हमिदिया रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांपैकी दरराेज १० ते १२ जणांना ‘टीबी’ झाल्याचे निदान हाेत आहे. सरकारच्या ‘टीबी’ रुग्णालयात काही दिवसांमध्ये ‘टीबी’चे निदान झालेल्या अनेक रुग्णांना काेराेना हाेऊन गेल्याचे आढळले
आहे.
डाॅ. लाेकेंद्र दवे म्हणाले, काेराेनाचा संसर्ग आणि त्यावरील उपचारांचा टीबीच्या संसर्गाशी काही संबंध आहे का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बुरशीजन्य आजार आणि ‘टीबी’चे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, ‘टीबी’चे बहुतांश रुग्ण उपचाराने बरे हाेत आहेत.