आमदाराच्या मुलाची 'दबंगगिरी', मनासारखे खायला न मिळाल्याने तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 05:15 PM2019-06-12T17:15:07+5:302019-06-12T17:17:38+5:30

अनंत कुमारने केलेल्या मारहाणीत रजत केसरी गंभीर जखमी झाला आहे.

patna city rjd mla son brutally beaten a boy because he did not serve tasty food | आमदाराच्या मुलाची 'दबंगगिरी', मनासारखे खायला न मिळाल्याने तरुणाला मारहाण

आमदाराच्या मुलाची 'दबंगगिरी', मनासारखे खायला न मिळाल्याने तरुणाला मारहाण

Next

पटना : बिहारमधील एका आमदाराच्या मुलाची दबंगगिरी समोर आली आहे. सासाराममधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार डॉ. अशोक कुमार यांच्या मुलाने एका हॉटेलमध्ये रजत केसरी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. अनंत कुमार असे या आमदाराच्या मुलाचे नाव आहे. त्याने हॉटेलमध्ये रजत केसरी या तरुणाला मनपसंद खाण्या-पिण्याचे साहित्य घेऊन आला नाही म्हणून मारहाण केली. 

अनंत कुमारने केलेल्या मारहाणीत रजत केसरी गंभीर जखमी झाला आहे. त्याला जमुहार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजत केसरीच्या डोक्याला मार लागल्यामुळे ऑपरेशन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रजत केसरीने ऑपरेशनच्या आधी दिलेल्या माहितीवरुन अनंत कुमार याच्यासह तीन जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रजत केसरीने सांगितले की, "रस्त्याच्या बाजूला भेळपुरीचा ठेला चालविण्याचे काम करतो. अनंत कुमार यांनी खाण्या-पिण्याचे साहित्य हॉटेलमध्ये मागविले. मात्र, त्यांना ते आवडले नाही. त्यावरुन त्यांनी वाद घातला आणि आपल्या तीन मित्रांसोबत बेदम मारहाण केली. यानंतर मी बेशुद्ध पडलो." याप्रकरणी पोलीस अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितेल की, 'जखमी रजत केसरीने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु असून लवकरच कारवाई करण्यात येईल.'
 

Web Title: patna city rjd mla son brutally beaten a boy because he did not serve tasty food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.