लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 08:17 AM2020-03-09T08:17:58+5:302020-03-09T08:26:45+5:30

पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे.

patna jdu leader daughter pushpam priya chaudhary herself in newspapers calling cm candidate vrd | लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा  

लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा  

Next
ठळक मुद्देमाजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तिनं स्वतःची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली असून, बऱ्याच वर्तमान पत्रात तिनं याची जाहिरातही दिली आहे. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरीनं प्लूरल्स (PLURALS) नावानं पक्षाची स्थापना केली असून, त्या पक्षाची ती अध्यक्ष आहे.

पाटणाः दरभंगाचे जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तिनं स्वतःची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली असून, बऱ्याच वर्तमान पत्रात तिनं याची जाहिरातही दिली आहे. तिनं बिहारच्या जनतेला संबोधित करत एक पत्रसुद्धा लिहिलं आहे. 
प्लूरल्स नावानं तयार केला राजकीय पक्ष
लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरीनं प्लूरल्स (PLURALS) नावानं पक्षाची स्थापना केली असून, त्या पक्षाची ती अध्यक्ष आहे. पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या आयडीएसमधून तिनं डेव्हलपमेंट स्टडिजमध्ये एमएसुद्धा केलं आहे. 
पुष्पम प्रिया चौधरीनं ट्विट करत बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे की, बिहारच्या प्रगतीला वेग पाहिजे असेल तर बिहारमध्ये बदल घडलाच पाहिजे. कारण बिहारला आणखी प्रगती करण्याचा हक्क आहे. बिहारला 2020मध्ये प्रगतिपथावर नेण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी प्लूरल्स (पार्टी)शी जोडले जावा.

पुष्पम प्रिया चौधरी हिनं ट्विट करत लिहिलं की, एलएसई आणि आयडीएसमधील मी केलेल्या अभ्यासानं आणि बिहारमधील माझ्या अनुभवांनी मला हे शिकवले आहे की, प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण असते. त्यामुळेच सर्वांच्या विकासाचं एकच मॉडल नसतं. पुष्पम प्रियाचे काका अजय चौधरी ऊर्फ विनय जेडीयूमध्ये आहेत. तसेच ते दरभंगा  जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. पुष्पम प्रिया हिचे आजोबा दिवंगत उमाकांत चौधरी हे नितीश कुमारांचे जवळचे मित्र राहिलेले आहेत.  

Web Title: patna jdu leader daughter pushpam priya chaudhary herself in newspapers calling cm candidate vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.