परिस्थिती गंभीर! 'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'; बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 03:02 PM2021-09-11T15:02:14+5:302021-09-11T15:15:09+5:30

Viral Fever in Bihar : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

patna viral fever is side effect of corona 25 children died in bihar | परिस्थिती गंभीर! 'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'; बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू

परिस्थिती गंभीर! 'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'; बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आणखी काही आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. व्हायरल फिव्हर हा कोरोनाचा साईड इफेक्ट असल्याची माहिती आता समोर आली आहे. बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. अचानक व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुझफ्फरपूर, चंपारण, गोपाळगंज, सीवान आणि मधुबनीसह अनेक राज्यात व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. गेल्या एक महिन्यात जवळपास 25 मुलांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटणाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयातील सर्व बेड्स फुल झाले आहेत. आरोग्य विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. आरोग्य विभागाने आपल्या काही टीम तयार केल्या असून त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य मंत्र्यांनी देखील या सर्व परिस्थितीवर आपलं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. तसेच सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं देखील म्हटलं आहे. मुलांवर योग्य उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास

पाटणामध्ये व्हायरल  फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. सरकारी रुग्णालयात तर एकही बेड शिल्लक नाही. डॉक्टरांनी व्हायरल फिव्हर हा कोरोनाचे साईड इफेक्ट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. रोज अनेक मुलांना उपचारासाठी रुग्मालयात आणण्यात येत आहेत. मात्र रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रुग्णालयात शिशू वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक बेडसमोर ऑक्सिजन प्लांट लावण्यात आला आहे. जेणेकरून मुलांना हरज भासल्यास लगेच ऑक्सिजन देता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

भयावह! रहस्यमयी आजाराचा कहर, भीतीने लोकांनी सोडलं राहतं घर; 50 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. तापाच्या धसक्याने लोकांनी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक शहरातील शेकडो लोकांना ताप आला आहे. याठिकाणी रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. फिरोजाबादमध्ये रहस्यमयी आजाराने आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मथुरामध्ये गेल्या 15 दिवसांत 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. चिमुकल्यांसह मोठ्यांचा देखील मृत्यू होत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फरहच्या एका गावात महामारीमुळे लोकांनी आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राहत्या घराला टाळं लावून ते दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकांकडे राहायला गेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची देखील चाचणी केली आहे. याचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

Web Title: patna viral fever is side effect of corona 25 children died in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.