पत्नीने थंडीत स्वेटर धुवायला टाकलं; संतापलेल्या पतीने संपूर्ण घरच जाळलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 04:15 PM2023-01-19T16:15:23+5:302023-01-19T16:21:18+5:30

थंडीत पत्नीने पतीचा स्वेटर धुण्यासाठी पाण्यात टाकला. यामुळे पती इतका संतप्त झाला की त्याने संपूर्ण घर पेटवून दिलं.

patna wife put sweater in water to wash in cold husband set fire in house gandhi maidan pirmuhani | पत्नीने थंडीत स्वेटर धुवायला टाकलं; संतापलेल्या पतीने संपूर्ण घरच जाळलं; नेमकं काय घडलं?

पत्नीने थंडीत स्वेटर धुवायला टाकलं; संतापलेल्या पतीने संपूर्ण घरच जाळलं; नेमकं काय घडलं?

Next

पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात. काही वाद हे अनेकदा टोकला देखील जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. बिहारमध्ये ही भयंकर घटना घडली. थंडीत पत्नीने पतीचा स्वेटर धुण्यासाठी पाण्यात टाकला. यामुळे पती इतका संतप्त झाला की त्याने संपूर्ण घर पेटवून दिलं. आग लागल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. काही मिनिटांत आग संपूर्ण घरात पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण गांधी मैदान पोलीस स्टेशन हद्दीतील पीरमुहानी भागाशी संबंधित आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. पती-पत्नी पीरमुहनी परिसरात एका वकिलाच्या घरात भाड्याने राहतात. महिलेने सांगितले की, तिने आपल्या पतीचा स्वेटर धुण्यासाठी पाण्यात टाकला होता. याच दरम्यान, तिच्या पतीने स्वेटरची मागणी केली. तिने सांगितले की, स्वेटर धुण्यासाठी पाण्यात ठेवला आहे.

पतीने इतर कपड्यांना लावली आग

पत्नीने हे सांगताच पतीला राग आला. पतीने इतर कपड्यांना आग लावली. पत्नीने पतीला काही समजावून सांगण्यापूर्वीच आग पसरू लागली. तिने थांबवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही. काही मिनिटांत आग पसरली. लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आणण्यात आली.

पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात 

पोलिसांनाही याबाबत माहिती मिळाली. गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. या प्रकरणी गांधी मैदान पोलीस ठाण्याचे प्रमुख अरुण कुमार यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समजले. त्याच्यावर उपचारही सुरू आहेत. त्यामुळेच त्याला अटक झालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: patna wife put sweater in water to wash in cold husband set fire in house gandhi maidan pirmuhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.