पटनायक पाचव्यांदा होणार मुख्यमंत्री; बुधवारी शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:16 AM2019-05-27T04:16:41+5:302019-05-27T04:17:00+5:30

ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आपला बालेकिल्ला शाबूत राखणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (बिजद) विधिमंडळ नेतेपदी रविवारी एकमताने निवड करण्यात आली.

Patnaik will be chief minister for fifth time; Swearing in on Wednesday | पटनायक पाचव्यांदा होणार मुख्यमंत्री; बुधवारी शपथविधी

पटनायक पाचव्यांदा होणार मुख्यमंत्री; बुधवारी शपथविधी

Next

भुवनेश्वर : देशभरात मोदी लाट असतानाही ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आपला बालेकिल्ला शाबूत राखणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (बिजद) विधिमंडळ नेतेपदी रविवारी एकमताने निवड करण्यात आली. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे.
नवीन पटनायक हे पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. १४६ सदस्य असलेल्या ओडिशा विधानसभेच्या निवडणुकांत बिजदने ११२ जागा जिंकल्या आहेत. तर राज्यातील २१ पैैकी १२ लोकसभा जागांवर या पक्षाने विजय मिळविला आहे. बिजद विधिमंडळ पक्षाच्या सुमारे पाऊण तास चाललेल्या बैठकीत नवीन पटनायक यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी आमदारांसमोर बोलताना ते म्हणाले की, ओडिशाच्या विकासासाठी आता माझे सरकार आणखी जोमाने प्रयत्न करेल. नवीन पटनायक यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी भुवनेश्वरमधील एक्झिबिशन ग्राऊंडमध्ये बुधवारी होणार आहे.
नवीन पटनायक यांनी ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. तसेच आपल्याला पाठिंबा देणाऱ्या ११२ आमदारांची यादीही सादर केली. विधानसभा निवडणुकांत बिजदला बहुमत मिळाल्याची खातरजमा करून राज्यपालांनी पटनायक यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.
एनडीएला सहकार्य करणार का?
फोनी चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची हवाई पाहणी केली होती. त्यावेळी ओडिशाला मदत करणाºया कोणालाही आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सूचक विधान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले होते. लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळालेल्या एनडीएला पटनायक भविष्यात सहकार्याचा हात देतील का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Patnaik will be chief minister for fifth time; Swearing in on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.