पाकच दहशतवाद्यांचा आश्रयदाता

By admin | Published: September 27, 2016 05:43 AM2016-09-27T05:43:43+5:302016-09-27T05:43:43+5:30

भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावे, असे बजावताना, पाकिस्तान बलुचिस्तानात अत्यंत क्रूर अशी

The patron of Pakkh terrorists | पाकच दहशतवाद्यांचा आश्रयदाता

पाकच दहशतवाद्यांचा आश्रयदाता

Next

संयुक्त राष्ट्रे : भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावे, असे बजावताना, पाकिस्तान बलुचिस्तानात अत्यंत क्रूर अशी सरकारी दडपशाही करीत असल्याचा हल्ला भारताने केला. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो मिळविण्याचे स्वप्न बघणे पाकिस्तानने सोडून द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भाषणात नुकत्याच केलेल्या भारतावरील हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांनी ज्यांना दहशतवादी जाहीर केले आहे ते उघडपणे फिरतात आणि द्वेषपूर्ण भाषणे करीत असतात, असा अप्रत्यक्ष उल्लेख स्वराज यांनी मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याचा केला. अतिरेक्यांना आश्रय देणे हा काही देशांचा व्यवसाय झाल्याचे त्या म्हणाल्या. काही देश असे आहेत की जे दहशतवादाची भाषा बोलतात, त्याला पोसतात, तो विकतात व निर्यातही करतात. असे देश आम्ही ओळखले पाहिजेत आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे स्वराज म्हणाल्या. नवाज शरीफ यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, जे काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नये. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी बलुचिस्तानसह होणारे अत्याचार आधी पाहावेत. बलोच लोकांना क्रौर्याला तोंड द्यावे लागत आहे आणि ती दडपशाही सरकारच करीत आहे.
दहशतवादामुळेच सर्वाम मोठे मानवी हक्क उल्लंघन होते आणि दहशतवाद सगळ््यात मोठा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे हे समजून घ्यावे. दहशतवाद निष्पापांना लक्ष्य करतो व अविचाराने हत्या करतो, असे स्वराज यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या मालकीच्या बँका नसतात की शस्त्रेही. त्यामुळे आम्ही खरा प्रश्न विचारला पाहिजे की दहशतवादाला कोण पैसा पुरवतो, कोण त्याला शस्त्रे देऊन आश्रयही देतो. (वृत्तसंस्था)

आमचा मैत्रीचा हात; त्यांच्याकडून मात्र हल्ले
चर्चेसाठी भारत अटी घालतो हा पाकचा दावा त्यांनी फेटाळला. आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी अटींवर नव्हे, तर मैत्रीतून पुढाकार घेतला. पण त्यांनी पठाणकोट आणि उरी येथे हल्ले घडवून आणले.
असल्या हल्ल्यांच्या माध्यमातून भूभाग मिळवता येईल, असे त्यांना वाटत असल्यास ते कधीही यशस्वी होणार नाहीत.

Web Title: The patron of Pakkh terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.