IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 09:53 PM2022-07-15T21:53:57+5:302022-07-15T21:54:30+5:30
Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात.
IIT Village of Bihar: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये शिक्षण घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मिळणे निश्चित मानले जाते. पण, यात प्रवेश मिळवणे, परीक्षा पास करणे खूप कठीण आहे. पण बिहारमध्ये असे एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरातील मुलाचे-मुलीचे आयआयटीमध्ये निवड होते.
मुले प्रशिक्षणाशिवाय तयारी करतात
बिहारमधील गया जिल्ह्यातील 'पटवाटोली' गाव आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या गावातील सुमारे डझनभर मुले आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि देशातील या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवतात. ही मुले कुठल्याही कोचिंगशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 1996 पासून याची सुरुवात झाली आहे.
आयआयटीचे वरिष्ठ मदत करतात
गावातील वाचनालयाच्या मदतीने मुले तयारी करतात. ही लायब्ररी येथील तरुण स्वतः चालवतात, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यासोबतच जे लोक आयआयटीमध्ये शिकले आहेत किंवा शिकत आहेत, ते आपल्या गावातील मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवतात. इथली मुलं दरवर्षी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करुन निवडली जातात, त्यामुळेच या गावाला 'आयआयटी गाव' असे म्हटले जाते.