शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, प्रियांका गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:34 AM2020-04-18T05:34:27+5:302020-04-18T05:34:39+5:30
प्रियांका गांधी यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात राज्य सरकारच्या आदेशानंतरही शेतातील उभे पीक काढणीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र लिहून त्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या पत्रात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, राज्यात आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. राज्यासाठी आर्थिक पुनर्निर्माण टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा. शेतीच्या प्रश्नाबाबत त्यांनी म्हटले आहे की, कम्बाईन मशीन चालक अन्य राज्यांतून येतात. परिणामी, प्रशासन त्यांना राज्यात येण्याची परवानगी देत नाही. कटाई मशीनच्या मालकांना प्रशासनाची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाड्याने कटाई मशीनही मिळत नाही. ऊस उत्पादक शेतकºयांची थकीत रक्कम देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
काच, पितळ उद्योग अडचणीत च्फिरोजाबादचा काच उद्योग, मुरादाबादचा पितळ उद्योग सध्या अडचणीत आहे. या उद्योगातील कामगारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक पुनर्निर्माणासाठी तज्ज्ञांना सोबत घेऊन टास्क फोर्स स्थापन करावा, मजुरांना नगदी आर्थिक सहायता आणि मोफत धान्य देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.