पैसे चुकते करा, नाहीतर ठीक होणार नाही! भाजपाच्या खासदाराला महिलेचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 04:14 PM2023-09-28T16:14:39+5:302023-09-28T16:14:55+5:30

खासदारांनी हा मला अडकविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. खासदारांचे पीए महेंद्र कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार २६ सप्टेंबरचा आहे.

Pay the money, or it won't work! Woman's call to BJP MP sumedhanand saraswati | पैसे चुकते करा, नाहीतर ठीक होणार नाही! भाजपाच्या खासदाराला महिलेचा फोन

पैसे चुकते करा, नाहीतर ठीक होणार नाही! भाजपाच्या खासदाराला महिलेचा फोन

googlenewsNext

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील भाजपाचे खासदार सुमेधानंद सरस्वती यांच्याकडे एक महिला सारखे फोन करून पैसे मागत आहे. सारखे सारखे फोन करून ती त्यांना शिवीगाळ करत आहे. पैसे चुकते कर नाहीतर ठीक होणार नाही असे ती म्हणत आहे. अखेर वैतागून खासदारांच्या पीएने दादिया पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

सरस्वती यांनी हा मला अडकविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. खासदारांचे पीए महेंद्र कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार २६ सप्टेंबरचा आहे. बुधवारी सरस्वती यांच्या मोबाईलवर महिलेचा फोन आला होता. तिने गुडगावच्या लक्ष्मी फायनान्स कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. तसेच काही पैसे चुकते करण्याविषयी बोलायला लागली. अचानक तिने शिवीगाळ सुरु केली. तुम्ही मंजु देवी यांच्या गॅरेंटर आहात, लवकरात लवकर पैसे चुकते करा नाहीतर ठीक होणार नाही, अशी धमकी तिने दिली आहे. 

यावेळी महेंद्र यांनी तिला हा खासदार सुमेधानंद सरस्वती यांचा फोन नंबर असल्याचे सांगितले. तरीही ही महिला शिव्या देत राहिली. यामुळे महेंद्र यांनी सरस्वती यांच्याकडे फोन दिला, त्यांच्यासोबतही ती चुकीच्या पद्धतीने बोलत होती. 

याबाबत खासदार सुमेधानंद यांनी सांगितले की, यापूर्वीही एका अज्ञात महिलेने फोन करून लाखो रुपयांची मागणी केली होती. मला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असे ते यावर म्हणाले आहेत. 
 

Web Title: Pay the money, or it won't work! Woman's call to BJP MP sumedhanand saraswati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा