दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या!

By admin | Published: March 10, 2016 02:45 AM2016-03-10T02:45:14+5:302016-03-10T02:45:14+5:30

देशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.

Payback for drought-hit farmers! | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या!

Next

शीलेश शर्मा, नवी दिल्ली
देशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.
मंगळवारी राज्यसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह देशभरातील सर्व दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे. त्यांना रबीच्या हंगामापूर्वी नुकसानभरपाई देणे गरजेचे होते. जेणेकरून ते खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरही शेती करू शकले असते; परंतु काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही, ही अत्यंत दु:खदायी बाब आहे.
लक्षवेधीद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वास्तव मांडताना दर्डा यांनी सांगितले की, देशाचा कणा बळकट केला नाही, तर प्रगती खुंटेल आणि ज्या प्रगतीचे स्वप्न आम्ही बघत आहोत त्याची पूर्तता करणे कठीणच नव्हे, तर अशक्य होईल. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी करावे.

ते म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३८,००० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु आतापर्यंत आठ राज्यांसाठी फक्त ९,४८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, हा चिंतेचा विषय आहे. हा विषय येथेच थांबत नाही. २७ जानेवारी २०१५ पर्यंत सरकारकडून निव्वळ २,३८६ कोटी रुपयेच जारी करण्यात आले आहेत; पण वस्तुस्थिती ही आहे की, शेतकऱ्यांवर अंदाजे सहा खर्व रुपयांचे कर्ज आहे आणि त्यापैकी केवळ ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची स्थिती अधिकाधिक दयनीय होत चालली आहे. दुसरीकडे मोठमोठी औद्योगिक घराणी आणि उद्योगपतींच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची सहजपणे फेररचना केली जाते ही सर्वात मोठी विडंबना आहे.

Web Title: Payback for drought-hit farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.