पगारी भिकारी गाणार मोदी सरकारचे गुणगान!

By admin | Published: August 10, 2015 01:23 AM2015-08-10T01:23:35+5:302015-08-10T01:23:35+5:30

कायम कुचेष्टेचा विषय ठरणाऱ्या भिकाऱ्यांना मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे ठरविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन हजार भिकाऱ्यांची रोजगार भरती

Paying praise beggars praise the Modi government! | पगारी भिकारी गाणार मोदी सरकारचे गुणगान!

पगारी भिकारी गाणार मोदी सरकारचे गुणगान!

Next

नवी दिल्ली : कायम कुचेष्टेचा विषय ठरणाऱ्या भिकाऱ्यांना मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे ठरविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन हजार भिकाऱ्यांची रोजगार भरती करताना त्यांच्याकडे सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत सोपविण्याची मोठी जबाबदारीची योजना आखली आहे.
तर सावधान! तुमच्या शहरात आता आगळेवेगळे भिकारी येऊ लागतील. त्यांच्या अंगावर चिंध्या असतील किंवा सिल्कचे झबले असतील. त्यांच्या तोंडी नर्सरी गीत, भजने, भावगीते यापैकी काहीही नसेल असेल ते मोदी सरकारचे यशोगान. मोदी सरकारच्या उपलब्धींकडे लक्ष वेधण्याची ही अभिनव कल्पना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अखत्यारीतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रत्यक्षात उतरवणार आहे. धावत्या रेल्वेतही हे भिकारी मोदीगीत गाताना दिसतील. ‘स्वच्छ भारत’ ते ‘मेक इन इंडिया’प्रमाणे भिकाऱ्यांच्या रोजगार भरतीची योजनाही अनोखी ठरणार आहे.
मोदी सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती लक्षवेधी गाण्यातून गाताना सरकारची प्रशंसा करण्यासाठी भिकाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाईल. रेल्वे प्रवाशांची भिकाऱ्यांकडून होणारी करमणूक हे दैनंदिन चित्र आता बदलून जाईल. भिकाऱ्यांच्या तोंडून हमखास ऐकू येणाऱ्या ‘आवारा हूँ’ आणि ‘चलती का नाम गाडी’ यांसारख्या जुन्या चित्रपट गीतांची जागा नव्या गाण्यांनी घेतलेली असेल. स्किल इंडिया, बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या सरकारी योजनांची गाणी ऐकायला येतील. मध्ययुगीन युरोपमध्ये किंवा बंगालमध्ये भिकाऱ्यांचा वापर केला जायचा. त्याच धर्तीवर उपयोगात आणल्या जाणाऱ्या भिकाऱ्यांना मोफत प्रवासाचा आनंद घेता येईल. मोदी सरकारच्या महत्त्वांकाक्षी योजनांची माहिती मौखिक आणि लेखी स्वरूपात दिली जाईल. व्यापक जनजागृतीसाठी तळागाळात मोहीम राबविताना सरकार पथनाट्ये आणि रस्त्याच्या कडेला भरविल्या जाणाऱ्या जादूच्या प्रयोगांसारख्या कार्यक्रमांचाही वापर करू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Paying praise beggars praise the Modi government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.