महागाई भत्त्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचे धरणे
By admin | Published: January 15, 2015 10:42 PM2015-01-15T22:42:58+5:302015-01-15T22:45:36+5:30
नाशिक : केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्यांनाही महागाई भत्ता तत्काळ लागू करावा व धुलाई भत्ता मिळावा, याप्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने काल गुरुवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कासार व राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष महेश आव्हाड यांनी उपस्थित कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. त्यात केंद्र सरकारने जुलै २०१४ पासूनच कर्मचार्यांना महागाई भत्ता लागू केला असून, तो राज्य सरकारी कर्मचार्यांनाही लागू करण्यात यावा, अशी भावना सरकारी कर्मचार्यांमध्ये असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचार्यांना ७ टक्केमहागाई भत्ता तत्काळ देण्यात यावा, तसेच धुलाई भत्त्याची रखडलेली २५०० रुपयांची रक्कमही चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर कासार यांनी केली. यावेळी या आंदोलनात चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष उज्ज्वला कर्हाड यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)