पेट्रोल पंपांवर 13 जानेवारीनंतरही कार्डांनी स्वीकारणार पेमेंट

By admin | Published: January 9, 2017 05:22 PM2017-01-09T17:22:31+5:302017-01-09T17:28:26+5:30

13 जानेवारीनंतरही पेट्रोल पंपांवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डांनी पेमेंट स्वीकारलं जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

Payments will be accepted by the card on petrol pumps even after January 13 | पेट्रोल पंपांवर 13 जानेवारीनंतरही कार्डांनी स्वीकारणार पेमेंट

पेट्रोल पंपांवर 13 जानेवारीनंतरही कार्डांनी स्वीकारणार पेमेंट

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - 13 जानेवारीनंतरही पेट्रोल पंपांवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डांनी पेमेंट स्वीकारलं जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. तसेच ग्राहकांना कार्डांनी व्यवहार केल्यावर अधिभारही द्यावा लागणार नाही. बँकांनी घेतलेल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर अधिभार लावण्याच्या निर्णयाला 13 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

बँक आणि तेल कंपन्यांवर हा अधिभार कोणी द्यायचा यावर चर्चा झाली. त्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी कार्डांनी पेमेंट स्वीकारणंही बंद केलं होतं. आरबीआयच्या निर्देशानुसारच मर्चेंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) लावता येतो. त्यासाठी आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेणार असल्याचं सांगितलं. रिटेल आऊटलेटपासून पेट्रोल पंप चालकांनी कमिशन एजंटसारखं काम करणं बंद केलं पाहिजे. अधिभार लावण्याच्या कोणत्याही निर्णयाला आम्ही मंजुरी देणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

(पंपांवरील कार्डबंदी तूर्त मागे)

तत्पूर्वी बँकांनी कार्डांद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एक टक्का एमडीआर शुल्क आकारणे सुरू करण्याचा निर्णय रविवारी रात्री उशिरा मागे घेतला. देशभरातील पंप चालकांनी सोमवारी ९ जानेवारीपासून क्रेडिट अथवा डेबिट कार्डांवर इंधन न देण्याचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्यांना इंधनाच्या दरात ०.७५ टक्के सूट देण्याची योजना जाहीर केली होती. त्यामुळे कार्डांच्या व्यवहारावर शुल्क आकारले जात नव्हते.

Web Title: Payments will be accepted by the card on petrol pumps even after January 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.