पी.बी. कडू यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:34+5:302017-01-23T20:13:34+5:30

सात्रळ : थोर स्वातंत्र्यसैनिक कॉ.पी.बी. कडू पा. यांना सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी रयतच्या कडू पा. विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कॉ.पी.बी. कडू पाटील फौंडेशनला कडू कुटुंबीयांकडून व नातेवाईकांकडून १० लाखांची देणगी सुपूर्द करण्यात आली. त्याचबरोबर अप्पाच्या मुलींनी रयत शिक्षण संस्थेस ५० हजाराची देणगी देण्यात आली तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जो चांगले काम करील त्यास पुरस्कार देण्यात येईल. त्याचबरोबर अप्पांचा जन्म दिवस हा समाजसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. अप्पांना श्रद्धांजली वाहताना दिलीप वळसे पाटील यांनी असे नमूद केले की, कडू पा. जिल्‘ाचे भूषण होते. त्यांनी केलेल्या समाजासाठी कार्याची नोंद म्हणून ते सर्वांना प्रिय होते. देशासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांनी केलेले सामाजिक कार्य त्यांचे चिरंजीव

P.B. All-round homage to Kadu | पी.बी. कडू यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

पी.बी. कडू यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Next
त्रळ : थोर स्वातंत्र्यसैनिक कॉ.पी.बी. कडू पा. यांना सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी रयतच्या कडू पा. विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कॉ.पी.बी. कडू पाटील फौंडेशनला कडू कुटुंबीयांकडून व नातेवाईकांकडून १० लाखांची देणगी सुपूर्द करण्यात आली. त्याचबरोबर अप्पाच्या मुलींनी रयत शिक्षण संस्थेस ५० हजाराची देणगी देण्यात आली तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जो चांगले काम करील त्यास पुरस्कार देण्यात येईल. त्याचबरोबर अप्पांचा जन्म दिवस हा समाजसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. अप्पांना श्रद्धांजली वाहताना दिलीप वळसे पाटील यांनी असे नमूद केले की, कडू पा. जिल्ह्याचे भूषण होते. त्यांनी केलेल्या समाजासाठी कार्याची नोंद म्हणून ते सर्वांना प्रिय होते. देशासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांनी केलेले सामाजिक कार्य त्यांचे चिरंजीव अरुण कडू पाटील पुढे नेत आहेत. बाळासाहेब थोरात म्हणाले की, अप्पांनी आपले आयुष्य परिपूर्ण जगले. त्यांनी देशासाठी, शिक्षण क्षेत्रात, खंडकरी चळवळीत काम करून सर्वांना शेवटपर्यंत न्याय देण्याचे काम केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अप्पांच्या निधनाने एका संघर्षाचे पर्व संपले. त्यांच्यासोबत वैचारिक, तात्विक मतभेद जरूर झाले परंतु मनात कधीही कटूता नाही ठेवली. त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीस प्रेरणादायी ठरले. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले की, माझे वडील अप्पांच्या शेतावर काम करीत होते. मी दहा वर्षांपासून त्यांना बघत आलो. त्यांनी त्यांची पेंशन शेवटपर्यंत गुहा अनाथआश्रमास दिली. त्याचबरोबर माजी मंत्री बी.जे. खताळ पाटील यांनी आठवणी सांगितल्या. आमदार शिवाजी कर्डिले, रावसाहेब म्हस्के, नरेंद्र घुले, जयंत ससाणे, डॉ.सुधीर तांबे यांनीही अप्पांना श्रद्धांजली वाहिली. सदर श्रद्धांजलीच्या शोकसभेस प्रसाद तनपुरे, दादासाहेब कळमकर, सचिन गुजर, विजयराव कोलते, कॉ.गंगाधर जाधव, भानुदास मुरकुटे, मिराताई चकोर, शामराव पटारे आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणात ---- उपस्थित होते. शोकसभेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: P.B. All-round homage to Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.