पीसीपीए स्ट्राईकर्सला टी-20 चे जेतेपद
By admin | Published: January 4, 2016 02:31 AM2016-01-04T02:31:06+5:302016-01-04T02:31:06+5:30
फोंडा : फोंडा क्रीडा संकुलातील मैदानाची दुर्दशा पाहून दु:ख होते. मात्र, या मैदानाचा विकास करण्याची इच्छा असूनही काही राजकीय हितशत्रूंमुळे त्यात अडचणी येत आहेत. मात्र भविष्यात या मैदानासंबंधी तसेच क्रीडा साहित्यासंबंधी कोणत्याही अडचणी आल्यास त्या सोडविण्याची आपली पूर्ण तयारी असून पीसीपीए तसेच फोंडा आरसीसीचे प्रशिक्षक यांनी या अडचणी आपल्याकडे घेऊन यावे. त्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर यांनी फोंडा क्रीडा संकुलात केले.
Next
फ ंडा : फोंडा क्रीडा संकुलातील मैदानाची दुर्दशा पाहून दु:ख होते. मात्र, या मैदानाचा विकास करण्याची इच्छा असूनही काही राजकीय हितशत्रूंमुळे त्यात अडचणी येत आहेत. मात्र भविष्यात या मैदानासंबंधी तसेच क्रीडा साहित्यासंबंधी कोणत्याही अडचणी आल्यास त्या सोडविण्याची आपली पूर्ण तयारी असून पीसीपीए तसेच फोंडा आरसीसीचे प्रशिक्षक यांनी या अडचणी आपल्याकडे घेऊन यावे. त्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर यांनी फोंडा क्रीडा संकुलात केले. फोंडा क्रिकेटर्स पॅरेन्ट्स असोसिएशन(पीसीपीए) आयोजित फोंडा आरसीसी र्मयादित टी-20 क्रिकेट स्पर्धेतच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत फोंडयाचे आमदार लवू मामलेदार, जीसीएचे फिजीओ डॉ. केतन भाटीकर, पीसीपीएचे अध्यक्ष संदेश धारेश्वरकर, सचिव अनिल कोरडे, उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर उपस्थित होते. आमदार लवू मामलेदार यांनी पीसीपीए फोंडयात सक्रिय झाल्यापासून फोंडयातील क्रिकेटपटूंना राज्यस्तरीय स्पर्धांत प्रतिनिधित्व मिळू लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पीसीपीएने व्यवसायिक खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून भविष्यात गोव्याचे खेळाडू भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतील असे सांगतानाच गोमंतकीय खेळाडूत तशी गुणवत्ता निश्चितच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी डॉ. केतन भाटीकर, अनिल कोरडे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी पीसीपीए आयोजित टी-20 स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे अजिंक्यपद पीसीपीए स्ट्राईकर्स संघाने पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पीसीपीए रायनोज संघावर सात गडयांनी विजय प्राप्त केला. तसेच स्पर्धेत चमकदार खेळ केलेल्या खेळाडूंना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आजच्या अंतिम सातन्यातील सामनावीर पुरस्कार स्ट्राईकर्सच्या सलील कोरडे याला देण्यात आला. (प्रतिनिधी) ढँ3 : 0301-ढडठ-01कॅप्शन: विजेत्या पीसीपीए स्ट्राईकर्स संघाला जेतेपदाचा चषक प्रदान करताना बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर, लवू मामलेदार, डॉ. केतन भाटीकर व इतर. (छाया- शेखर नाईक)