मोर विहिरीत पडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2015 11:57 PM2015-07-09T23:57:39+5:302015-07-09T23:57:39+5:30

जयताळा येथील घटना : उपचारानंतर गोरेवाडा जंगलात सोडले

Peacock fell into the well! | मोर विहिरीत पडला!

मोर विहिरीत पडला!

Next
ताळा येथील घटना : उपचारानंतर गोरेवाडा जंगलात सोडले
नागपूर : जयताळा परिसरातील एकात्मतानगरमधील एका विहिरीत गुरुवारी मोर पडल्याची घटना पुढे आली. परिसरातील नागरिकांना तो दिसताच एका दोराच्या मदतीने त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला त्याची माहिती देण्यात आली. त्यावर वन विभागाचे वनपाल एल.जी. गेडाम, के.एच. अहिरकर, आर.वाय. इंगळे व पी. सूर्यवंशी घटनास्थळी पोहोचले. तसेच त्या मोराला ताब्यात घेऊन सेमिनरी हिल्स येथे आणण्यात आले. येथे त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुन्हा सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गोरेवाडा येथील जंगलात सोडण्यात आले. याशिवाय गत मंगळवारी मेहंदीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ झाडावरील नायलॉन मांजामध्ये अडकून एक घुबड जखमी झाले होते. त्याला परिसरातील तरुण सचिन बिसेन याने सुरक्षित खाली काढून वन विभागाच्या स्वाधीन केले होते. सध्या ते घुबड सुरक्षित असल्याची माहिती आहे.

Web Title: Peacock fell into the well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.