सेक्स करु शकत नाही म्हणून मोर राष्ट्रीय पक्षी, न्यायमूर्तींनी तोडले अकलेचे तारे

By Admin | Published: May 31, 2017 08:51 PM2017-05-31T20:51:02+5:302017-05-31T21:10:52+5:30

मोर ब्रह्मचारी असल्यानेच त्याला राष्ट्रीय पक्षी बनवण्यात आल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे.

Peacock national birds, judges killed by stars, Akal's stars | सेक्स करु शकत नाही म्हणून मोर राष्ट्रीय पक्षी, न्यायमूर्तींनी तोडले अकलेचे तारे

सेक्स करु शकत नाही म्हणून मोर राष्ट्रीय पक्षी, न्यायमूर्तींनी तोडले अकलेचे तारे

googlenewsNext

ऑनालइन लोकमत
जयपूर, दि. 31 - शेजारचा नेपाळ हा देश हिंदूराष्ट्र आहे व तेथे गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे त्याप्रमाणे भारतातही गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणारे राजस्थान हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश महेशचंद्र शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या शिफारशीचं समर्थन करण्यासाठी अनेक दाखले दिले आहेत. मोर ब्रह्मचारी असल्यानेच त्याला राष्ट्रीय पक्षी बनवण्यात आल्याचा दावाही शर्मा यांनी केला आहे. विशेष म्हणजे शर्मा हे आजच निवृत्त झाले आहेत.
गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची शिफारस करताना आपण अनेक धार्मिक ग्रंथ आणि वेदांचे दाखले दिल्याचे नमूद करत गाय माणसासाठी किती महत्त्वाची आहे, हे शर्मा यांनी सांगितले. न्या. शर्मा यांनी नंतर पत्रकारांशी गप्पा मारताना या निकालपत्राचे सविस्तर विश्लेषण करून त्याचे समर्थन केले. एवढेच नव्हे तर भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे प्रजनन कसे होते याविषयी धादांत अवैज्ञानिक सिद्धांत सांगून त्यांनी आपली विद्वत्ताही पाजळली. हिंदीत बोलताना न्या. शर्मा म्हणाले: जो मोर है,यह आजीवन ब्रह्मचारी है. वह मोरनी के साथ कभी भी सेक्स नही करता. इसके जो आसूं आते हे, मोरनी उन्हे चुभकर गर्भवती होती है और मोर या मोरनी को जन्म देती है! असा अजब दावा शर्मा यांनी केला. मोर ब्रह्मचारी असल्यानेच भगवान श्रीकृष्ण त्याच्या शिरपेचात मोरपीस लावायचा. साधू-संतही म्हणूनच मोरपिसांचा वापर करतात. मंदिरातही म्हणूनच मोरपिसं दिसतात. अशाचप्रकारे असलेलं गायीचं महत्त्व लक्षात घेऊन गायीला राष्ट्रीय पशू म्हणून जाहीर करायला हवं, असे शर्मा म्हणाले.

Web Title: Peacock national birds, judges killed by stars, Akal's stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.