पतीचं आजारपण, पैसे नाहीत... नाईलाजातून Video बनवायला सुरुवात केली, आज आहे स्टार YouTuber

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:42 PM2023-01-04T12:42:20+5:302023-01-04T12:45:37+5:30

पिहूचे सोशल मीडियावर हजारो फॅन फॉलोअर्स आहेत. पण YouTuber ला ही प्रसिद्धी एका रात्रीत मिळाली नाही. यासाठी पिहू यादवने खूप कठीण प्रसंग पाहिले आहेत.

Peehu Yadav youtuber social media star inspirational story make you emotional sapna chaudhary | पतीचं आजारपण, पैसे नाहीत... नाईलाजातून Video बनवायला सुरुवात केली, आज आहे स्टार YouTuber

पतीचं आजारपण, पैसे नाहीत... नाईलाजातून Video बनवायला सुरुवात केली, आज आहे स्टार YouTuber

googlenewsNext

सोशल मीडिया स्टार, डान्सर आणि यूट्यूबर पिहू यादवचा प्रवास समजल्यावर तुम्हीही म्हणाल की, डर के आगे जीत है. पिहू यादव तिच्या तिचा देसी अंदाज आणि हरियावाणी नृत्यासाठी ओळखली जाते. आज ती लोकप्रिय आहे. पण एक काळ असा होता की, तिला तिला लोकांचे खूप टोमणे ऐकावे लागले. पिहूचे सोशल मीडियावर हजारो फॅन फॉलोअर्स आहेत. पण YouTuber ला ही प्रसिद्धी एका रात्रीत मिळाली नाही. यासाठी पिहू यादवने खूप कठीण प्रसंग पाहिले आहेत. काही दिवसांपूर्वी पिहूने सोशल मीडियावर तिची गोष्ट शेअर केली होती. जिथे त्याने चाहत्यांसोबत तिच्या कठीण काळाचा उल्लेख केला.

पिहू यादवने दिलेल्या माहितीनुसार, ती दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. नजबगड या छोट्याशा गावात लहान वयातच तिचा विवाह झाला होता. ज्या गावात महिलांना मुक्तपणे जगण्याचा अधिकार नाही. लग्नानंतर पिहू यादव एका सामान्य मुलीसारखं आयुष्य जगत होती. त्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनात कठीण टप्पा आला. पिहू यादवच्या पतीला लग्नाच्या दोन वर्षांनी ब्लड कॅन्सर झाला.

"लग्नाच्या दोन वर्षांनी मला कळलं की माझ्या नवऱ्याला ब्लड कॅन्सर आहे. माझ्या पतीच्या जगण्याची आशा नव्हती. मला एक दीड वर्षाची मुलगीही होती. पतीच्या उपचारात सर्व काही खर्च झाले. आता उपचारासाठी पैसेही शिल्लक नव्हते. एके दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीला रक्ताची व्यवस्था करण्यासाठी सांगितलं. मात्र ती मदत करू शकली नाही पण तिने मला एक प्लॅटफॉर्म सांगितला जिथून मी माझ्या पतीच्या उपचारासाठी पैसे जमा करू शकेन."

यशाच्या प्रवासाविषयी बोलताना पिहू यादव म्हणते, मैत्रिणीशी बोलून मी एक नॉर्मल व्हिडीओ बनवला आणि पोस्ट केला. मी घरी जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर व्हिडीओला 12 लाख व्ह्यूज मिळाले होते. यानंतर पिहूला आत्मविश्वास मिळाला आणि तिने डान्स व्हिडिओ बनवून पोस्ट करायला सुरुवात केली. पिहूला डान्स कसा करायचा हे कळत नव्हते. पण तिला सपना चौधरी खूप आवडायची. त्यामुळे तिने सपना चौधरीच्या डान्स मूव्हची कॉपी करून व्हिडीओ बनवायला सुरुवात केली.

पिहू व्हिडिओच्या माध्यमातून पतीच्या उपचारासाठी पैसे गोळा करत होती. तर दुसरीकडे गावकरी सासू-सासऱ्यांना फोन करून गलिच्छ बोलत होते. लोक पिहूला टोमणे मारत म्हणाले, 'नवरा कॅन्सरने मरत आहे, तुझी सून व्हिडीओ बनवत आहे.  जग काहीही म्हणो. पण तिची सासू आणि पिहूचा नवरा तिच्यासोबत होता. त्यामुळे लोकांची पर्वा न करता ती व्हिडिओ बनवत राहिली. पिहू यादवच्या पतीवर प्रार्थना आणि औषधांचा परिणाम झाला. हॉस्पिटलमधून बरा होऊन तो घरी आला. पिहू यादव आज सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Peehu Yadav youtuber social media star inspirational story make you emotional sapna chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.