चामडी सोलून काढेन! भाजपाच्या महिला खासदाराची पोलीस अधिका-याला धमकी
By admin | Published: April 28, 2017 12:37 PM2017-04-28T12:37:48+5:302017-04-28T13:20:30+5:30
मागच्या सरकारमध्ये त्यांनी भरपूर गैरकारभार केला. पण आता व्यवस्थित काम केले नाही तर, चामडी सोलून काढू असे प्रियांका म्हणाल्या.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 28 - उत्तरप्रदेशची सूत्रे हाती घेताच योगी आदित्यनाथ यांनी एकाबाजूला चांगल्या कामाचा धडाका सुरु केलेला असताना दुस-या बाजूला भाजपाचेच लोकप्रतिनिधी सरकारी अधिका-यांबरोबर धमकीची भाषा करत आहेत. उत्तरप्रदेशातील बाराबंकीच्या खासदार प्रियांका सिंह रावत यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकाला फोनवरुन धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
महत्वाच म्हणजे आपल्या या कृत्याबद्दल त्यांना अजिबात खेद नाहीय. जेवढी मलई खाल्ली आहे तेवढी बाहेर काढेन. चामडी सोलून काढेन या भाषेत प्रियांका सिंह रावत यांनी फोनवरुन ग्याननजय सिंह यांना धमकी दिली. ग्याननजय बाराबंकीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत. जेव्हा पत्रकारांनी प्रियांका यांना धमकीबद्दल विचारले तेव्हा सुद्धा त्यांनी तेच शब्द वापरले.
मागच्या सरकारमध्ये त्यांनी भरपूर गैरकारभार केला. पण आता व्यवस्थित काम केले नाही तर, चामडी सोलून काढू असे प्रियांका म्हणाल्या. केंद्रात नरेंद्र मोदी तर, राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. जे चांगले काम करतील तेच जिल्ह्यात राहतील. जर त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर, आम्ही योग्य कारवाई करु असे त्या म्हणाल्या. ग्याननजय यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, गैरवतर्णूक केली म्हणून त्यांना खडसावले असे प्रियांका म्हणाल्या. आठवडयाभरातील ही दुसरी घटना आहे. बुधवारी भाजपा आमदार केसर सिंह यांनी बँकच्या मॅनेजरला केबिन बाहेर खेचून आणून मारहाण केली होती.