पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 03:59 PM2017-09-25T15:59:35+5:302017-09-25T16:08:26+5:30

दिल्ली उच्च न्यायालयानं आज बॉलिवूड चित्रपट पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

Peepley Live co-director Farooqi acquitted of rape charges | पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Next
ठळक मुद्देपीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. पीडितेचा जबाब हा विश्वासार्ह नसल्याचा दावा करत न्यायालयानं फारुखी यांना या आरोपातून मुक्त केलं आहे. पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांना कनिष्ठ न्यायालयानं बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

नवी दिल्ली, दि. 25 - दिल्ली उच्च न्यायालयानं आज बॉलिवूड चित्रपट पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. पीडितेचा जबाब हा विश्वासार्ह नसल्याचा दावा करत न्यायालयानं फारुखी यांना या आरोपातून मुक्त केलं आहे. पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांना कनिष्ठ न्यायालयानं बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णयाला स्थगिती देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. फारुखी यांनी कथितरीत्या मार्च 2015मध्ये दक्षिण दिल्लीतील स्वतःच्या घरात 30 वर्षीय अमेरिकन संशोधक महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. दिल्ली उच्च न्यायालयानं 85 पानांच्या निर्णयातून तुरुंगात असलेल्या फारुखी यांना तात्काळ मुक्त करा, असा आदेश पोलिसांना दिला आहे. पीडित महिलेचा जबाब हा विश्वासार्ह नाही, तसेच फारुखी यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याची शंकाही न्यायालयानं व्यक्त केली आहे. न्यायालयानं यावेळी पीडित महिलेच्या वकिलांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. खरंच अशी घटना झाली होती का ?, जर असा प्रकार झाला तर तो पीडितेच्या सहमतीनं झाला होता का ?, न्यायालयाच्या या प्रश्नांवर पीडिता संभ्रमात पडली, त्यामुळेच न्यायालयानं फारुखी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तत्पूर्वी फारुखी यांना कनिष्ठ न्यायालयानं 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयात सुनावणीवेळी फारुखी यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.



त्या दिवशी असा कोणताही प्रकार घडला नव्हता. तसेच फारुखी आणि अमेरिकन संशोधक महिला यांच्या 2015मध्ये संबंध असल्याचा युक्तिवादही फारुखी यांच्या वकिलानं केला आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी फारुखी यांच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढत बलात्कार झाल्याचं न्यायालयाला सांगितलं आहे. त्यामुळेच कनिष्ठ न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावल्याचीही माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. कनिष्ठ न्यायालयानं 4 ऑगस्ट 2016ला फारुखी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यावेळी पीडिता त्यांच्या घरी एकटी असताना फारुखी यांनी त्याचा गैरफायदा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच न्यायालयानं फारुखी यांच्याकडून 50 हजार रुपयांचा दंडही वसूल केला होता. महिलेच्या तक्रारीवरून फारुखी यांना 19 जून 2015 रोजी अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. 

Web Title: Peepley Live co-director Farooqi acquitted of rape charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.