Pegasus Case: ‘पेगॅसस’ प्रकरणी आज निकाल, स्पायवेअरद्वारे संभाषणावर पाळत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:04 AM2021-10-27T06:04:06+5:302021-10-27T06:04:30+5:30
Pegasus Case: इस्राइल मधील एनएसओ ग्रुपच्या पेगॅसस स्पायवेअर द्वारे संभाषणावर पाळत ठेवण्यात आली होती.
नवी दिल्ली : काही राजकारणी, पत्रकार आदींचे अनधिकृतपणे फोन टॅपिंग केल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली
व्हावी, या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय बुधवारी देणार आहे. इस्राइल मधील एनएसओ ग्रुपच्या पेगॅसस स्पायवेअर द्वारे संभाषणावर पाळत ठेवण्यात आली होती.
त्याविरोधात न्यायालयात अनेक याचिका आल्या होत्या. त्यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवत असल्याचे १३ सप्टेंबर रोजी जाहीर केले होते. अशा समितीत तज्ज्ञांचा सहभाग असणे आवश्यक असून, त्यासाठी कोणीही तयार नव्हते, असे न्यायालयाने म्हटले होते.