पेजावर मठाचे विश्वेशा तीर्थ स्वामींचे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 11:34 AM2019-12-29T11:34:11+5:302019-12-29T11:34:28+5:30
गेल्या काही दिवसांपासून स्वामी विश्वेशा यांची प्रकृती खालवली होती.
नवी दिल्ली : कर्नाटकातील उडुपीच्या पेजावर मठाचे स्वामी विश्वेशा तीर्थ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्वामी विश्वेशा यांची प्रकृती खालवली होती. त्यांना मनिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. निमोनियावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळीच डॉक्टरांनी त्यांचा मेंदू काम करत नसल्याचे सांगत मठामध्येच व्हेंटिलेटरची सोय करत ठेवण्यास सांगितले होते. सकाळी ते बेशुद्ध होते. यामुळे त्यांना सकाळी 8.30 च्या सुमारास मठामध्ये हलविण्यात आले होते. मात्र, सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
उडुपीचे आमदार रघुपती भट यांनी सांगितले की, स्वामींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज अजराकाडूच्या महात्मा गांधी मैदानात तीन तासांसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री येडीयुराप्पा येणार आहेत.
PM Modi tweets,"Sri Vishvesha Teertha Swamiji of Sri Pejawara Matha, Udupi will remain in hearts & minds of lakhs of people for whom he was always a guiding light. A powerhouse of service and spirituality,he continuously worked for a more just & compassionate society. Om Shanti" pic.twitter.com/ZtRia1Kj3q
— ANI (@ANI) December 29, 2019
Udupi MLA K Raghupati Bhat: Pejavara Mutt Seer Vishwesha Teertha Swami passes away at Udupi Sri Krishna Mutt. #Karnatakapic.twitter.com/nktXNjMH56
— ANI (@ANI) December 29, 2019