"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:10 AM2024-10-04T11:10:12+5:302024-10-04T11:22:27+5:30

Vande Bharat : वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा आणि प्रवाशांचा प्रवास विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर सुरक्षा यंत्रणा सातत्याने कडक कारवाई करत आहेत. 

pelted stones on vande bharat gave strange reason claims he wanted to steal mobile | "ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण

"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण

देशातील सर्वात प्रसिद्ध हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासासाठी ओळखली जाते. आजच्या युगात ही ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. मात्र याच दरम्यान भीती पसरवण्याच्या उद्देशाने काही लोक दगडफेक करून या ट्रेनला लक्ष्य करतात. वाराणसीसह विविध शहरांतून अशा घटना घडल्या आहेत, आता कायद्याचे उल्लंघन करणारे सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत. 

यूपी एटीएसने अशाच एका आरोपीला अटक केली आहे जो नुकताच वाराणसीहून जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्याच्या घटनेच सामील होता. हुसैन उर्फ ​​शाहिद असं त्या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा आणि प्रवाशांचा प्रवास विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर सुरक्षा यंत्रणा सातत्याने कडक कारवाई करत आहेत. 

यूपी एटीएसने काशी स्थानकाजवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करणारा आरोपी हुसैन उर्फ ​​शाहिदला मुघलसराय चंदौली येथून अटक केली आहे. यापूर्वी पवनकुमार साहनी यालाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. यूपी एटीएसने आरोपी शाहिदला अटक करून त्याची चौकशी केली.

चौकशीदरम्यान शाहिदने सांगितलं की, अशा घटनांमागील मुख्य उद्देश ट्रेनचा स्पीड कमी करणं हा असतो, त्यानंतर खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावून घेणं. चौकशीनंतर, आरोपी शाहिदला पुढील कायदेशीर कारवाईसाठी एटीएस फील्ड युनिट वाराणसीने रेल्वे संरक्षण दल - व्यास नगर चंदौलीकडे सोपवलं आहे. 
 

Web Title: pelted stones on vande bharat gave strange reason claims he wanted to steal mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.