पेमा खांडू देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री

By Admin | Published: July 18, 2016 06:02 AM2016-07-18T06:02:18+5:302016-07-18T06:02:18+5:30

रविवारी पेमा खांडू यांनी काँग्रेस सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर चोवना मेइन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Pema Khandu, the youngest chief minister of the country | पेमा खांडू देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री

पेमा खांडू देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री

googlenewsNext


इटानगर : अरुणाचलमधील वेगवान राजकीय घडामोडीत रविवारी पेमा खांडू यांनी काँग्रेस सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर चोवना मेइन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे ३७ वर्षीय पुत्र पेमा खांडू हे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले आहेत. पूर्वोत्तरच्या या राज्याचे ते नववे मुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांना राज्यपाल तथागत राय यांनी राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दोरजी खांडू यांचा एका विमान अपघातात २०११ मध्ये मृत्यू झाला होता. शपथविधीनंतर येथे पत्रकारांशी बोलताना पेमा खांडू म्हणाले की, राज्यपाल राज्यात परतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. राय हे त्रिपुराचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे अरुणाचलचा अतिरिक्त कार्यभार आहे. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेउन सर्व प्रमुख नेत्यांना सोबत घेउन राज्याचा विकास करु, असे ते म्हणाले. अरुणाचलमधील नाट्यमय राजकीय घडामोडीत शनिवारी काँगे्रसने विधिमंडळ पक्षाच्या
बैठकीत पेमा खांडू यांची नेतेपदी निवड केली. (वृत्तसंस्था)
>तरुणपणीच राजकारणात
पेमा खांडू (३७) हे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलेली आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर ते तरुणपणीच राजकारणात सक्रीय झाले.
तवांग येथील रहिवाशी असलेल्या पेमा यांनी वडीलांच्या मृत्यूनंतर २०११ मध्ये प्रथम अरुणाचल विधानसभेत प्रवेश केला. आमदार म्हणून ते बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर कॅबिनेटमध्येही त्यांची वर्णी लागली होती. तुकी यांच्या सरकारमध्ये ते शहरी विकास मंत्री होते.

Web Title: Pema Khandu, the youngest chief minister of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.