पेन्शनच्या नियमात मोठा बदल! आता महिन्याच्या 'या' तारखेला मिळणार पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:39 AM2022-01-21T05:39:12+5:302022-01-21T05:39:36+5:30

ईपीएफओने नुकतेच एक परिपत्रक काढले असून यात म्हटले आहे की, आरबीआयच्या सूचनेनुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये, बँकांना पेन्शन महिनाअखेरीस द्यावी लागेल

Pension Rule BIG Change You will Receive Pension by this Date From Now | पेन्शनच्या नियमात मोठा बदल! आता महिन्याच्या 'या' तारखेला मिळणार पेन्शन

पेन्शनच्या नियमात मोठा बदल! आता महिन्याच्या 'या' तारखेला मिळणार पेन्शन

googlenewsNext

नवी दिल्ली : कर्मचारी पेन्शन योजनेच्या (ईपीएस) पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आहे. आता त्यांची पेन्शन महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मिळणार आहे. 

कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन ठरवलेल्या तारखेला होत नसल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पेन्शनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, ईपीएस पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शनची रक्कम सामान्यतः महिन्याच्या सुरुवातीला खूप उशिरा जमा केली जाते. यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

ईपीएफओने नुकतेच एक परिपत्रक काढले असून यात म्हटले आहे की, आरबीआयच्या सूचनेनुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये, बँकांना पेन्शन महिनाअखेरीस द्यावी लागेल.

ईपीएस काय आहे?
खासगी क्षेत्रातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ (ईपीएस) सुरू करण्यात आली. ईपीएसमध्ये कमाल मासिक योगदान १२५० रुपये आहे. वयाच्या ५८ नंतर, कर्मचाऱ्याला ईपीएसच्या पैशातून मासिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

Web Title: Pension Rule BIG Change You will Receive Pension by this Date From Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.