शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन देणार, भाजपाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:05 PM2019-04-08T13:05:25+5:302019-04-08T14:16:08+5:30

देशातील 60 वर्षावरील शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन सुरु करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.

Pensions to farmers and small businesses; BJP releases their manifesto for Lok Sabha Elections 2019 | शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन देणार, भाजपाचा संकल्प

शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन देणार, भाजपाचा संकल्प

Next

नवी दिल्ली : आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे ठेवले आहे. नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात 'संकल्पपत्र' प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार अशा विविध मुद्द्यावर भाजपाने 'संकल्पपत्र' तयार केले आहे. यात देशातील 60 वर्षावरील शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन सुरु करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच, किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार असून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. 


भाजपाच्या 'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे ...

- 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही
- सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.
- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार 
- दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी
- छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार
- प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य
- सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार
- तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार
-सिटीजनशिप विधेयक लागू करणार
- सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार
- समान नागरी कायदा लागू करणार.
- देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार
- सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार
- कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध 
- 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार
- सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर
- कलम 35-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार
- 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार
- कुपोषणाचा स्तर घटवणार
- आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार
- सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार
- सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध
- सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार
- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार
- नल सें जल यावर काम करणार
- दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार

Web Title: Pensions to farmers and small businesses; BJP releases their manifesto for Lok Sabha Elections 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.