लोकांवर विचारसरणी लादली जातेय

By admin | Published: October 18, 2015 02:08 AM2015-10-18T02:08:30+5:302015-10-18T02:08:30+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

People are being imparted thinking | लोकांवर विचारसरणी लादली जातेय

लोकांवर विचारसरणी लादली जातेय

Next

बक्सर (बिहार) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे आयोजित पक्षाच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. मोदी सरकारच्या कार्यकाळात सांप्रदायिक उन्माद निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करून गांधी म्हणाल्या, अफवांवरून निर्दोष लोकांचे बळी जात आहे. यामुळे देशाची लोकशाही आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. सहा दशकांच्या
काँग्रेस शासनावर मोदींकडून
वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने देशात लोकशाही बळकट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि मोदी यांचे पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच फलित आहे. याउलट केंद्रातील भाजपाप्रणीत सरकार मात्र लोकशाही मूल्यांपासून भरकटले आहे. लोकांवर आपली विचारसरणी थोपून हे सरकार लोकशाहीसाठी मोठा धोका निर्माण करीत असून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात येत आहे, असे प्रत्युत्तर गांधी यांनी दिले. दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लीम इसमाची झालेली
हत्या, बुद्धिजीवींवरील वाढलेले
हल्ले आदी घटनांचा उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

पंतप्रधान अपयशी ठरलेत
- महागाई आकाशाला भिडली असून सर्वसामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे.
- महिला व युवापिढीला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास पंतप्रधान अपयशी ठरले आहेत.
- काँग्रेसने ६० वर्षात काय केले अशी विचारणा केली जाते. आमच्या पक्षाने अनेक क्षेत्रात क्रांतिकारक बदल केले. काँग्रेसने या देशाची एकता, अखंडता आणि वारसा जपून ठेवला.
- बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या २८ आॅक्टोबरला ५० जागांवर मतदान होणार आहे.

Web Title: People are being imparted thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.