गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही - नरेंद्र मोदी
By admin | Published: June 29, 2017 01:51 PM2017-06-29T13:51:47+5:302017-06-29T13:56:24+5:30
गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 29 - गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना दिला आहे. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांचं हे वक्तव्य आलं आहे. उस्मान अन्सारी यांच्या घराजवळ गाय मृतावस्थेत आढळली असता सुमारे १०० जणांच्या जमावाने घरात घुसून अन्सारी यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या घराला आग लावली.
साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं. "गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असं मोदी बोलले आहेत. आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. महात्मा गांधींच्या देशात आहोत, याचा का म्हणून विसर पडतो ? अशी खंतही मोदींनी यावेळी व्यक्त केली.
Killing people in the name of Gau Bhakti is not acceptable. This is not something Mahatma Gandhi would approve of: PM Modi
— ANI (@ANI_news) June 29, 2017
"हिंसेमुळे कोणतेच प्रश्न सुटले नाही आणि सुटणारही नाहीत. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही", असंही मोदी यावेळी बोलले आहेत.
We are the land of non violence. We are the land of Mahatma Gandhi. Why do we forget this?: PM Modi pic.twitter.com/fUUXLVszDy
— ANI (@ANI_news) June 29, 2017
"जग आज ज्या आव्हानांचा सामना करत आहे, त्यांचा सामना करण्याची ताकद महात्मा गांधींच्या विचारात आहे", असं मोदींनी यावेळी सांगितलं. मोदींनी यावेळी बोलताना देशवासियांना साबरमती आश्रमाला भेट देण्याचं आवाहन केलं.
No one has the right to take the law in his or her hands: PM Modi
— ANI (@ANI_news) June 29, 2017