अरे बापरे! रस्त्यावर पडलेले हिरे उचलण्यासाठी लोकांची झुंबड; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:35 PM2023-09-25T12:35:23+5:302023-09-25T12:35:53+5:30

बाजारात रस्त्यावर हिरे पडल्याची माहिती सर्वत्र पसरली आणि खळबळ उडाली. लोकांनी पाहिलं तर तिथे खरंच हिरे पडलेले होते. यानंतर बाजारात झुंबड उडाली.

people collecting diamonds scattered on road of surat diamond market video goes viral | अरे बापरे! रस्त्यावर पडलेले हिरे उचलण्यासाठी लोकांची झुंबड; नेमकं काय घडलं?

फोटो - आजतक

googlenewsNext

गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतला डायमंड आणि टेक्सटाईल सिटी म्हणतात. डायमंड सिटी असल्याने शहरातील महिधरपुरा व वराछा परिसरात हिरा मार्केट उभारले जाते. लोक रस्त्यावर आणि फूटपाथवर बसून हिरे विकतात. वराछा भागातील डायमंड मार्केट रस्त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये हिरे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर हिरे गोळा करताना दिसत आहेत.

हिऱ्यांचा व्यवसाय करणारे लोक वराच्छा डायमंड मार्केटमध्ये पोहोचले होते. सामान्य नागरिकही मुख्य रस्त्यावरून येत जात होते. त्यानंतर बाजारात रस्त्यावर हिरे पडल्याची माहिती सर्वत्र पसरली आणि खळबळ उडाली. लोकांनी पाहिलं तर तिथे खरंच हिरे पडलेले होते. यानंतर बाजारात झुंबड उडाली. रस्त्यावर पसरलेले हिरे लुटण्यासाठी दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिक आपली कामं सोडून हिरे गोळा करू लागले. 

हिरे उचलण्यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. काही लोकांनी हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. लोक रस्त्यावरून हिरे उचलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही जणांना एकही हिरा मिळाला नाही तर काही लोकांनी दहाहून अधिक हिरे मिळाले. मात्र हिऱ्यांची तपासणी केली असता सर्वांनाच धक्का बसला. 

रस्त्यावर पडलेले हिरे हे खरे हिरे नसून अमेरिकन डायमंड आहेत, ज्यांची किंमत काही खास नाही. हिरे गोळा करणाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. खरा हिरा खाणीतून येतो जो मौल्यवान आहे. या घटनेनंतर हिरे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हिरे व्यापारी धीरू भाई नावडिया म्हणतात की कोणीतरी आमची गंमत केली आहे जी चुकीची आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: people collecting diamonds scattered on road of surat diamond market video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Suratसूरत