देशाची जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी - पोल

By admin | Published: January 27, 2016 10:00 AM2016-01-27T10:00:52+5:302016-01-27T14:41:02+5:30

देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे एका सर्व्हेतून समोर आलं आहे.

The people of the country are behind Narendra Modi | देशाची जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी - पोल

देशाची जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी - पोल

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - असहिष्णूतेच्या मुद्यावरून देशातील वातावरण तापलेले आहे. केंद्रातील मोदी सरकारलाही त्याचा फटका बसल्याचे वाटत असतानाच सरकारसाठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे 'एबीपी न्यूज-निल्सन'च्या सर्व्हेतून समोर आलं आहे. गेल्या २० महिन्यांतील मोदी सरकारचं काम समाधानकारक असल्याचे सांगत मोदींनी दाखवलेले अच्छे दिनांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं ब-याचशा (४२ टक्के) लोकांचं मत आहे. तसेच आजच्या घडीला पुन्हा निवडणुका झाल्यास एनडीए सरकारच बहुमताने निवडून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास अनेकांनी वर्तवल्याचे या पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे. 
देशातील ४६ टक्के लोकांनी मोदी सरकारची कामगिरी चांगली असल्याचे म्हटले असून सरकारपेक्षाही नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक कामगिरी वरचढ असल्याचे अनेकांना वाटते. सुमारे ५४ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी चांगली वा खूप चांगली असल्याचे म्हटले आहे. गेल्या दीड वर्षात सरकारचा कारभार चांगला वा खूप चांगला असल्याबाबत अंदाजे ४६ टक्के लोकांनी मान्यता दिली. 
 
सर्वात लोकप्रिय नेता कोण?
देशाच्या जनतेवर नरेंद्र मोदींचा करिष्मा अद्यापही कायम असल्याचे या सर्व्हेत दिसून आले. देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न विचारला असता ५८ टक्के लोकांनी मोदींचे नाव घेतले तर त्यांच्यापाठोपाठ ११ टक्के सहभागींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेतले. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ४ टक्के लोकांनी पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र अवघ्या १ टक्के नागरिकांना लोकप्रिय नेते वाटतात. 

वादग्रस्त मुद्यांवर जनतेचं मत काय?
दादरी प्रकरण, पठाणकोट हल्ला, पाकिस्तानबाबतचे सरकारचे धोरण या आणि अशा अनेक वादग्रस्त मुद्यांवर जनतेने परखडपणे मत नोंदवले आहे. सरकारनं थेट लष्करी कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवावा असे ६५ टक्के जनतेचे मत आहे. तर पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला सरकारला आणखी योग्य पद्धतीने हाताळता आला असता असे ३६ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर सरकारला हा हल्ला योग्य रितीने हाताळता आला नसल्याची टीका १५ टक्के सहभागींनी केली आहे. बीफच्या मुद्यावरून दादरी येथे झालेल्या हत्याकांडाप्रकरणी मोदींनी मौन न बाळगता वक्तव्य करणे गरजेचे होते असे ५० टक्के जनतेचे मत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आवरण्यात मोदी अपयशी ठरल्याचे ३८ टक्के लोकांचे नमूद केले आहे. 

Web Title: The people of the country are behind Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.