VIDEO: ...अन् सर्वसामान्यांनी बघता बघता फेरीवाल्याचे ३० हजारांचे आंबे लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 09:24 PM2020-05-22T21:24:20+5:302020-05-22T21:26:24+5:30
विक्रेत्याच्या अहायतेचा सामान्यांकडून गैरफायदा; ३० हजारांच्या आंब्यांची लूट
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या मजुरांना आणि कामगारांना बसला आहे. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल झाले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रस्त्यावर विक्री करण्यास काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र त्यातही काही ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती विक्रेत्यांना लुटत असल्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी दिल्लीत असाच प्रकार घडला.
दिल्लीच्या जगतपुरी भागात छोटे नावाचा एक जण आंबे विकत होता. आंबे जास्त असल्यामुळे त्यानं काही पेट्या रस्त्याच्या कडेला ठेवल्या होत्या. जवळच वाद झाल्यानं काही जण आले आणि त्यांना छोटेला त्याची आंब्यांची गाडी पुढे नेण्यास सांगितली. छोटे काही अंतर पुढे गेला. आंब्यांच्या पेट्यांजवळ विक्रेता नसल्याचं पाहत रस्त्यावरुन जाणारे अनेकजण धावत पेट्यांजवळ आले. त्यांनी शक्य तितके आंबे हातात घेतले. काहींनी आंबे खिशात, पिशवीत भरले आणि तिथून निसटले. काहींनी तर रिक्षा, सायकल, दुचाकीवरुन उतरून आंबे पळवले.
The haloed middle class, robbing mangoes of a poor hawker. Honesty is just lack of opportunity to be dishonest. #Delhi
— Gabbbar (@GabbbarSingh) May 22, 2020
pic.twitter.com/ujTJMzl0Hs
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात सर्वसामान्यांकडून सुरू असणारी आंब्यांची लूट अगदी स्पष्टपणे दिसत आहे. मी जवळपास १५ पेट्या आंबे आणले होते. त्यांच्या खरेदीसाठी ३० हजार मोजले होते. आंब्यांच्या पेट्यांपासून थोडं दूर जाताच आसपास असलेल्या अनेकांनी आंबे चोरले, असं छोटूनं सांगितलं. छोटेनं याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही.
अभिमानास्पद! आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्वीकारलं WHOच्या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपद
लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात
पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका
"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"
भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....