या सरकारी योजनेवर लोकांची झुंबड, ₹78000 चा मिळतोय फायदा; PM मोदींनी म्हणाले, पटापट रजिस्ट्रेशन करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 11:20 AM2024-03-17T11:20:45+5:302024-03-17T11:21:57+5:30
ही योजना सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आतच, 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे.
पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजनेंतर्गत आतापर्यंत तब्बल 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी नोंदणी केली आहे. या योजनेला मिळत असलेल्या या मोठ्या प्रसिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत आनंदी आहेत. पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आतच, 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे.
या राज्यांमध्ये 5 लाखहून अधिक रजिस्ट्रेशन -
देशातील सर्वच भागांतून रजिस्ट्रेशन होत आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात 5 लाखहून अधिक रजिस्ट्रेशन झाल्याचे दिसून आले आहे. ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही, त्यांनी येथे http://pmsuryaghar.gov.in/ लवकरात लवकर रडिस्ट्रेश करवे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मोदी म्हणाले, या अनोख्या उपक्रमामुळे ऊर्जा उत्पादनाच्या सुनिश्चितते बरोबरच, कुटुंबांच्या विजेच्या खर्चातही लक्षणीय घट होईल. हा उपक्रम पर्यावरणपुरक जीवनशैलीला (LiFE) मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी आणि एका चांगल्या ग्रहासाठी योगदान देण्यास तयार आहे.
Outstanding news!
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2024
In about a month since it was launched, over 1 crore households have already registered themselves for the PM-Surya Ghar: Muft Bijli Yojana.
Registrations have been pouring in from all parts of the nation. Assam, Bihar, Gujarat, Maharashtra, Odisha, Tamil…
केंद्र सरकारकडून असे मिळेल आर्थिक सहाय्य -
- 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40% एवढे केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळेल. सध्याच्या प्रमाणित किंमतीनुसार, 1 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 30,000 रुपयांचे अनुदान, 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 60,000 रुपयांचे अनुदान, 3 kW आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी 78,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल.
- सर्व कुटुंबाना राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज करता येईल आणि छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य विक्रेत्याची निवड करता येईल. हे राष्ट्रीय पोर्टल कुटुंबाना योग्य प्रणालीचे आकारमान, लाभाचा अंदाज, विक्रेत्याचे मानांकन इत्यादींविषयी समर्पक माहिती देऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना सहाय्य करेल.
- कुटुंबांना त्यांच्या छतांवर सध्या 3 kW पर्यंतच्या सौर पॅनल सिस्टीमच्या स्थापनेसाठी सुमारे 7% इतक्या तारण-मुक्त कमी व्याजदर असलेल्या कर्जाचा लाभ घेता येईल.
योजनेची इतर वैशिष्ट्ये -
- देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात एकआदर्श सौर ग्राम विकसित केले जाईल. हे गाव ग्रामीण भाग, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांमध्ये त्यांच्या भागात छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल.
- शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांना त्यांच्या क्षेत्रात छतावर सौर पॅनेल बसवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी फायदा होईल.
- ही योजना नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी (RESCO) वर आधारित मॉडेल्ससाठी देयक सुरक्षिततेसाठी तसेच आर टी एस मधील नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी निधी प्रदान करते.