जनतेने केजरीवालांचा सल्ला ऐकला, मच्छरला नाही दिले मत - सोशल मीडिया
By admin | Published: April 26, 2017 12:29 PM2017-04-26T12:29:07+5:302017-04-26T12:53:39+5:30
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला असून त्याचे पडसाद लगेचच सोशल मीडियावर उमटले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला असून त्याचे पडसाद लगेचच सोशल मीडियावर उमटले आहेत. टि्वटर, व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे खिल्ली उडवणारे मेसेजेस फिरत आहेत. टि्वटरवर #आप_साफ हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहे.
भाजपाचा विजय अनपेक्षित किंवा धक्कादायक नाही. दिल्लीमध्ये अजूनही लोक आम आदमी पार्टीला मत देतात हे धक्कादायक असे एका युझरने म्हटले आहे. केजरीवालांनी मतदारांना डेंग्युच्या मच्छरला मत देऊ नका अशी विनंती केली होती. लोकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आपला मतदान केले नाही असे एका युझरने म्हटले आहे.
दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पदाचा राजीनामा दिला. पुढचे वर्षभर कुठलेही पद न स्वीकारता ते सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहेत. केजरीवाल आता तरी पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का ? असा सवाल अनेक युझर्सनी विचारला आहे.
Shocking is not that BJP won.. Shocking is there are still people who voted for aap in delhi.. or is it EVM tampering?