संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही, टीकाकारांना मोदींचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 07:29 PM2017-10-04T19:29:00+5:302017-10-04T22:06:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा सादर केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या काळात विकासदरात घसरण झाली नाही का? असा सवाल करत टीकाकारांना उत्तर दिले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा सादर केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या काळात विकासदरात घसरण झाली नाही का? असा सवाल करत टीकाकारांना उत्तर दिले. येथील कंपनी सेक्रेटरींच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जवळपास 99 टक्के जमा झालेल्या नोटा, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर व्यवहारात येत असलेल्या अडचणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट होऊनही देशात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचे भाव चढे असल्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी सरकारवर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपल्या सरकारची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी आणि काँग्रेसच्या कार्यकाळातील कामगिरीची आकडेवारी सादर केली. तसेच 8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन असल्याचे सांगत नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले.
सरकारच्या आर्थिक धोरणांवर यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी टीका करून सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यालाही मोदींनी उत्तर दिले. तसेच देशाची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगत आगामी काळात विकासाच्या दृष्टीने मोठ्या घोषणा करणार असल्याचेही जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे -
- मागील सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या काळात 12 हजार मेगावॅट अक्षय्य ऊर्जेची (Renewable) निर्मिती, या सरकारने 3 वर्षांत 22हजार मेगावॅटपेक्षा जास्त अक्षय्य ऊर्जेची निर्मिती केली.
- 2100 किमीपेक्षा जास्त किमीचे रेल्वेमार्ग बनवले
- जास्तीत जास्त परदेशी चलन भारतात यावं यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे.
- जुने व्यवहार उरकणर नाही, व्यापारांचा मोदींना मोदींचा सल्ला
- कांग्रेसच्या काळात आठ वेळी विकासदर पाच टक्क्यांहून कमी
- काळ्या पैशाविरोधात देशात सफाई मोहिम.
- मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीही केला नाही.
- 8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन
- देशात परदेशी गुंतवणूकीचा विक्रम.
- कॉंग्रेसच्या काळात विकासदरात घसरण झाली नाही का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल
- प्रामाणिक लोकांच्या हिताचं संरक्षण करणार.
- देशाची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी आहे.
- विकासासाठी मोठे निर्णय घेणार आहेत.
- जून महिन्यानंतर पॅसेंजर गाड्या विक्रीत 12 टक्क्यांनी वाढ झाली.
- गेल्या 3 वर्षांत सरासरी 7.5 टक्के इतका विकासदर होता.
- एप्रिल-जूनमध्ये विकासदर खाली आला हे मान्य पण ही परिस्थिती बदलण्यास सरकार वचनबद्ध.
- सर्व ज्ञान आम्हालाच आहे असा दावा आम्ही कधीच करत नाही.
- आरबीआयने येत्या तिमाहीत 7.7 टक्के विकासदराचे लक्ष्य ठेवले आहे.
- विमान प्रवास संख्येतही लक्षणीय वाढ.
- ट्रॅक्टर विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- रेल्वे लाइनचे दुपदरीकरण मागील सरकारच्या तुलनेत दुप्पट झाले.
- रेल्वे, रस्ते बांधणी क्षेत्रातले विद्यमान सरकारचे काम मागील सरकारच्या तुलनेत जास्त.