‘भारत माता की जय’ पाकिस्तानवर भारी; रीट्रीट साेहळ्यात पाकमध्ये शांतता, प्रेक्षकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 05:51 AM2023-04-30T05:51:56+5:302023-04-30T05:52:16+5:30

अटारी, हुसैनीवाला आणि सादकी या सीमेवर रीट्रीट साेहळा रंगताे. यात केवळ भारताकडीलच नव्हे, तर पाकिस्तानातूनही लाेक येत असतात.

People not coming from Pakistan side for retreat ceremony on India-Pak Border Atari | ‘भारत माता की जय’ पाकिस्तानवर भारी; रीट्रीट साेहळ्यात पाकमध्ये शांतता, प्रेक्षकांची पाठ

‘भारत माता की जय’ पाकिस्तानवर भारी; रीट्रीट साेहळ्यात पाकमध्ये शांतता, प्रेक्षकांची पाठ

googlenewsNext

अटारी - पंजाबमध्ये भारत-पाक सीमेवर विविध ठिकाणी हाेणारे रीट्रीट साेहळे पाहण्यासाठी शेकडाे पर्यटक जात असतात. साेहळ्यादरम्यान भारतीय सैनिकांचे मनाेबल वाढविण्यासाठी ‘भारत माता की जय’ अशा घाेषणांनी आसमंत दुमदुमताे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून एक बदल प्रकर्षाने जाणवत आहे. ताे म्हणजे पाकिस्तानी नागरिकांची वाढती अनुपस्थिती. भारताच्या बाजूला प्रचंड गर्दी असते. तर पाकिस्तानी बाजूला स्मशान शांतता असते.

अटारी, हुसैनीवाला आणि सादकी या सीमेवर रीट्रीट साेहळा रंगताे. यात केवळ भारताकडीलच नव्हे, तर पाकिस्तानातूनही लाेक येत असतात. भारतीय बाजूला भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद, वंदे मातरम् असे नारे निनादतात.

हे स्फूर्तिदायक वातावरण पाहण्यासारखे असते. यावेळी भारतीयांचा जाेश एवढा असताे की त्यात पाकिस्तानी प्रेक्षकांचा आवाज पूर्णपणे दबून जाताे. डीजेचा आवाज जाेरात असताे, मात्र कमी प्रेक्षक असल्यामुळे पाक रेजर्सचे खचलेले मनाेबल स्पष्टपणे दिसून येते. 

महागाईचे संकट
पाकिस्तानात सध्या अभूतपूर्व आर्थिक संकट आले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे लाेकांचा पर्यटनावरील खर्च कमी झाला आहे. साहजिकच ते आपल्या सैनिकांच्या प्रदर्शनाऐवजी स्वत:च्या अडचणी साेडविण्यात व्यस्त आहेत.

हुसैनीवालावर जेमतेम डझनभर पाकिस्तानी प्रेक्षक
अटारीएवढी गर्दी हुसैनीवाला येथे हाेत नाही. मात्र, शेकडाे भारतीय रीट्रीट साेहळ्यात उपस्थित हाेते. भारत आणि पाकिस्तानचे जवान एकमेकांना आव्हान देतात, त्यावेळी वातावरण राेमांचित हाेते. मात्र, पाकिस्तानातून तेथे जेमतेम डझनभर प्रेक्षक त्यांच्या सैनिकांना प्राेत्साहन देण्यासाठी येतात. 
 

Web Title: People not coming from Pakistan side for retreat ceremony on India-Pak Border Atari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.