पाक सीमेवरील लोक म्हणतात, ड्रग्जपासून हवी मुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 11:15 AM2023-11-19T11:15:19+5:302023-11-19T11:15:42+5:30

गंगानगर जिल्ह्यात ‘उडता पंजाब’सारखी स्थिती; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मतदारांची मागणी

People on Pak border say, we want freedom from drugs! | पाक सीमेवरील लोक म्हणतात, ड्रग्जपासून हवी मुक्ती!

पाक सीमेवरील लोक म्हणतात, ड्रग्जपासून हवी मुक्ती!

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगानगर : रमेश कुमारने बिकानेरमध्ये काम करत असताना हेरॉइनचे इंजेक्शन घेण्यास सुरुवात केली आणि तब्बल पाच वर्षे तो या नशेच्या पूर्णपणे आहारी गेला होता. कुमार आता हेरॉइनच्या व्यसनाच्या अथांग खोलीतून कसाबसा बाहेर आला असून, जीवनाची घडी बसवण्याचा प्रयत्न करीत आहे.
सीमेपलीकडून जिल्ह्यात आणल्या जाणाऱ्या अमली पदार्थांना बळी पडून गंगानगरमध्ये कुमार यांच्यासारखे अनेकजण आहेत, जे बरे होण्याच्या आशेने व्यसनमुक्ती केंद्रात गर्दी करतात.

राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या गंगानगर जिल्ह्यातील स्थानिक लोक अमली पदार्थांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी लावून धरत आहेत. पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असलेल्या कुमार यांनी सरकारला जिल्ह्यातील अमली पदार्थांचे सेवन संपवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

एका महिन्यात २५० ते ३०० रुग्ण पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु त्यापैकी मर्यादित खाटांमुळे केवळ १५ रुग्णांना एका वेळी दाखल केले जाऊ शकते. त्यापैकी बहुतांश गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यातील आहेत. आम्ही सरकारची मदत मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत.
- डॉ. मनीषा बागला, प्रभारी, जनसेवा रुग्णालय पुनर्वसन केंद्र, गंगानगर

सवाई माधोपूरमध्ये त्रिकोणी लढत
रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या राजस्थानच्या सवाई माधोपूर मतदारसंघात पर्यावरण किंवा त्यासंदर्भातील समस्या नव्हे तर जातीय समीकरणे निर्णायक घटक आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा व काँग्रेसचे विद्यमान आमदार दानिश अबरार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. भाजपच्या बंडखोर आशा मीणा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

Web Title: People on Pak border say, we want freedom from drugs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.