भयावह! 'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर, भीतीने लोकांनी सोडलं राहतं घर; 50 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 02:33 PM2021-09-02T14:33:45+5:302021-09-02T14:41:22+5:30

People scared mysterious fever 60 families fled in village : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. तापाच्या धसक्याने लोकांनी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

up people scared mysterious fever 60 families fled in village mathura | भयावह! 'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर, भीतीने लोकांनी सोडलं राहतं घर; 50 जणांचा मृत्यू

भयावह! 'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर, भीतीने लोकांनी सोडलं राहतं घर; 50 जणांचा मृत्यू

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,28,57,937 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 47,092 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 509 जणांचा मृत्यू झाला आहे, कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,39,529 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. तापाच्या धसक्याने लोकांनी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक शहरातील शेकडो लोकांना ताप आला आहे. याठिकाणी रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. 

फिरोजाबादमध्ये रहस्यमयी आजाराने आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मथुरामध्ये गेल्या 15 दिवसांत 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. चिमुकल्यांसह मोठ्यांचा देखील मृत्यू होत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फरहच्या एका गावात महामारीमुळे लोकांनी आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राहत्या घराला टाळं लावून ते दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकांकडे राहायला गेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची देखील चाचणी केली आहे. याचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती, 50 जणांचा मृत्यू

आठवड्याभरात 26 लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये रहस्यमयी आजार पसला आहे. यामध्ये लोकांना खूप ताप येऊन त्यांचा मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, मॅनपुरी, एटा आणि कासगंज जिल्ह्यामध्ये 50 लोकांचा ताप, डिहायड्रेशन आणि प्लेट्सलेट अचानक कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 26 लहान मुलांचा समावेश आहे. या रहस्यमयी आजारातून बरं होण्यासाठी लोकांना 12 दिवसांहून अधिक काळ लागत आहे. 

रुग्णालयात एका बेडवर दोन किंवा तीन रुग्णांवर उपचार

सरकारी रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रहस्यमयी आजार चिंतेचा विषय आहे. फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात एका बेडवर दोन किंवा तीन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डॉ. हंसराज सिंह यांनी हा रहस्यमयी आजार असलेल्या 100 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे. आग्रा जिल्हा रुग्णालयातील डॉ. एके अग्रवाल यांनी दररोज 200 रुग्ण आढळून येत असल्याचं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन आठवड्यापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: up people scared mysterious fever 60 families fled in village mathura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.