धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:03 PM2019-06-06T15:03:21+5:302019-06-06T15:05:53+5:30

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली.

people who defame religion are non religious says nitish kumar | धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला

धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला

Next

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनाटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांच्यातील शाब्दीक चकमक अद्याप सुरुच आहेत. आता नितीश कुमार यांनी गिरीराज सिंह यांच्यावर कडाडून टीका केली आहे. नितीश कुमार यांनी नाव न घेता गिरीराज सिंह यांना अधर्मी म्हटले.

नितीश कुमार म्हणाले की, जे लोक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करत नाहीत, ते अधर्मी असतात. अशा लोकांची धर्मावर अजिबात श्रद्धा नसते. हीच लोक धर्माला बदनाम करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यापैकी अनेक लोकांना मी चांगलच ओळखतो. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे कुठल्याही थराला जावू शकतात, अशी टीका नितीश कुमार यांनी गिरीराज सिंह यांचे नाव न घेता केली.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली.

यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. समाजात सद्भावना आणि आपुलकीचे वातावरण तयार व्हावे, यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करतो. देशात प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. प्रत्येक धर्माच्या सणांसाठी शुभेच्छा देतो. बिहामध्ये दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे प्रार्थना करतो, की राज्यात दुष्काळ पडू नये, असंही नितीश कुमार यांनी म्हटले.

 

Web Title: people who defame religion are non religious says nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.