"ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला, त्यांना हुकूमशहांनी तुरुंगात डांबलं, हा इतिहास"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 06:47 PM2023-04-14T18:47:36+5:302023-04-14T18:48:58+5:30
आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.
नवी दिल्ली - दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केल्यामुळे अद्यापही ते तुरुंगातच आहेत. त्यावरुन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी यापूर्वीच मनिष सिसोदिया यांच्यावर राजकीय हेतुने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. आता, पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे.
आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मात्र, आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याला आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यास अटक केल्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा संताप व्यक्त केला आहे. आता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतानाही केजरीवाल यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशहा म्हटलं आहे.
ज्या लोकांनी मनिष सिसोदिया यांना तुरुंगात टाकलं ते देशाचे दुश्मन आहेत. इतिहास साक्षीला आहे, ज्या ज्या वेळी समाजात शिक्षणाचा प्रसार-प्रचार करण्याचं काम एखाद्या व्यक्तीने केलं, त्यांना त्यावेळच्या तानाशहांनी तुरुंगात टाकलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत की प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेब, बाबासाहेब बनले कारण, त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलं. आम्हाला वाटतं, देशातील प्रत्येक विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हावा, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता निशाणा साधला.
#WATCH जिन लोगों ने मनीष सिसोदिया को जेल भेजा है वो देश के दुश्मन हैं। वो नहीं चाहते हैं कि देश तरक्की करे। इतिहास गवाह है जिस व्यक्ति ने समाज के अंदर शिक्षा का प्रचार-प्रसार करने की कोशिश की। इतिहास में तानाशाह ने उसी को जेल में डाल दिया: डॉ बी.आर. अंबेडकर जयंती कार्यक्रम में… pic.twitter.com/e7DfhARIv5
— ANI_HindiNews (@AHindinews) April 14, 2023
दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी सीबीआयने मनिष सिसोदिया यांना ८ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर,
दिल्ली अबकारी धोरण प्रकरण व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणेने सिसोदिया यांना ९ मार्च रोजी तिहार तुरुंगातून अटक केली. १० मार्च रोजी सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी, ईडीने कोर्टाकडे सिसोदिया यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.